
हृदयद्रावक! पुणे-नगर महामार्गावरील वाघोली येथे डंपरने ९ जणांना चिरडलं; पाहा नावे…
पुणे: अमरावतीवरून कामासाठी पुण्यात आलेल्या 9 जणांना पुणे-नगर महामार्गावरील वाघोली-केसनंद परिसरात डंपरने चिरडल्याची घटना घडली आहे. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला असून, 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पुणे शहरात काम शोधण्यासाठी आलेल्या या कामगारांनी फुटपाथवर आसरा घेतला होता. पण भरधाव वेगाने आलेल्या डंपरने 9 जणांना चिरडले. यामध्ये 3 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 6 जण गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये एक आणि दोन वर्षांच्या चिमुकल्यांचा समावेश आहे. पोलिसांनी तात्काळ डंपर चालकाला बेड्या ठोकल्या आहेत. डंपर दुसऱ्या बाजुला वळला असता तर आणखी 15-16 जणांचा बळी गेला असता, घटनास्थळी असलेल्यांनी आरडाओरड केली आणि डंपर दुसऱ्या बाजूला घालायला सांगितले. मात्र, त्यामध्ये अनेक जण जखमी झाले आहेत, असे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.
डंपर चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे नागरिकांनी सांगितले. याप्रकरणी डंपर चालक गजानन शंकर तोट्रे (वय 26 वर्षे रा. नांदेड) याला पोलिसांनी अटक केली आहे. अपघाताची घटना रविवारी (ता. २२) रात्री बारा ते एक वाजण्याच्या सुमारास घडली आहे. जखमी कामगारांवर सध्या ससून रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. हे सर्व कामगार आहेत. रविवारी रात्री ते अमरावतीवरून पुण्यात कामासाठी आले होते. या घटनेबाबत प्रत्यक्षदर्शींनी माहिती देताना सांगितले की, ‘आम्ही 40 जण कामासाठी इथे पुण्याते आलो आहोत, इकडे काम भेटतं म्हणून आम्ही अमरावती वरून पुण्याला काल रात्री आलो. आम्ही चार वर्षाआधी पण इथे काम करत होतो. आम्ही इथेच राहतो. गेल्या चार वर्षापासून आम्ही इथून कुठे गेलो नाही, आम्ही इथे झोपल्यानंतर डंपर चालक सरळ अंगावर आला, आणि बाळांच्या अंगावर घातला. घटना घडली त्यावेळी सर्वजण झोपले होते. बारा एक वाजण्याच्या सुमारास डंपर फुटपाथवरून आत घुसल्यानंतर आरडाओरडा सुरू झाली. त्यानंतर आम्ही सगळे उठलो. डंपरचालकाने मुलांना चिरडलं होते. तसाच तो पुढे गेला. आम्ही कालच अमरावती वरून पुण्याला आलो होतो.’
एका प्रत्यक्षदर्शी महिलेने सांगितले, ‘पुण्याच्या बाजूने डंपर आला. सगळे खाली फुटपाथवर झोपलेले होते. सगळे आपल्या लहान मुलांसह इकडे-तिकडे झोपलेले होते. डंपरचालकाने दारू प्यायलेली होती. त्यांनी मुलांच्या अंगावरून पुढे पर्यंत वाहन घातलं. जर त्याने दुसऱ्या बाजूला डंपर घातला असता तर पंधरा-सोळा जण डंपर खाली चिरडले गेले असते. तिथे असलेल्या अनेकांनी आरडा-ओरड केल्यामुळे अनेक प्राण वाचले. अन्यथा मोठा अनर्थ झाला असता.’
मृत झालेल्यांची नावे –
1. विशाल विनोद पवार वय 22 वर्ष, रा. अमरावती मूळ जिल्हा
2. वैभवी रितेश पवार वय 1 वर्ष
3. वैभव रितेश पवार वय 2 वर्ष
जखमी झालेल्यांची नावे-
1. जानकी दिनेश पवार, 21 वर्षे
2. रिनिशा विनोद पवार 18
3. रोशन शशादू भोसले, 9 वर्षे
4. नगेश निवृत्ती पवार, वय 27 वर्षे
5. दर्शन संजय वैराळ, वय 18
6. आलिशा विनोद पवार, वय 47 वर्षे
हृदयद्रावक! सांगलीतील एकाच कुटुंबातील 6 जणांचा अपघातात जागीच मृत्यू; पाहा नावे…
हृदयद्रावक! नाशिकचे कुटुंब उपचारासाठी मुंबईला अन् समुद्रात बुडाले…
हृदयद्रावक! क्रेनला बांधलेला तुटला दोर अन् युवकाचे पाय झाले धडावेगळे…
हृदयद्रावक! ट्रॅक्टरच्या गिअरवर पडला पाय अन् दोन बहिणींचा चिरडून मृत्यू…
हृदयद्रावक! पतीच्या निधनानंतर पोलिसात भरती अन् शिवशाही बस अपघातात मृत्यू…

