आम्ही वेगळे झालोय! अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्र याचे ट्विट…
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टी आणि तिचा पती राज कुंद्रा सध्या चर्चेत आहेत. पण, राज कुंद्रा याने सोशल मीडियाच्या माध्यमातून विभक्त झाल्याचे जाहीर केले आहे. पण या पोस्टमध्ये अभिनेत्याने कोणाचं नाव घेतलेलं नाही. पण तरीही शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा विभक्त होणार का? असा प्रश्न चाहते उपस्थित करत आहेत.
‘यूटी 69’ या सिनेमाच्या माध्यमातून राज कुंद्रा चित्रपटसृष्टीत अभिनेता म्हणून पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे. अभिनेता म्हणून राजचा हा पहिलाच चित्रपट आहे. चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान राजने एक ट्वीट केले आहे. या ट्वीटमुळे चाहते संभ्रमात पडले आहेत. याट्वीटनंतर राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी वेगळे झाले का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
राज कुंद्रा आणि शिल्पा शेट्टी 2009 मध्ये लग्नबंधनात अडकले आहेत. त्यांच्या लग्नाला आता 14 वर्षे पूर्ण होत आहेत. या 14 वर्षांच्या प्रवासात अनेकदा एकमेकांना अडचणींमध्ये ते मदत करताना दिसले आहेत. पण आता राज कुंद्राच्या ‘त्या’ ट्वीट नंतर राज आणि शिल्पाचे बिनसले असल्याच्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
राज कुंद्राने शिल्पा शेट्टी सोबतच्या नात्याबाबत हे ट्विट केलंय की आणखी काही हे अजूनही समोर आलेले नाही. युजर्सनी अनेक प्रश्न त्या ट्विटवर विचारले आहेत. तर काहींनी हा चित्रपटाच्या प्रमोशनचा फंडा असल्याचे म्हटले आहे.
राज कुंद्रा कारागृहात गेल्यानंतर शिल्पा शेट्टी त्याच्यासोबत खंबीरपणे उभा राहिली. कठीण काळात तिने साथ दिली. त्यामुळे आता राज कुंद्राने केलेल्या ट्विटचा नेमका अर्थ काय? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे.
We have separated and kindly request you to give us time during this difficult period 🙏💔
— Raj Kundra (@onlyrajkundra) October 19, 2023
अभिनेत्रीचा संशयास्पद मृत्यू; बलात्कार झाल्याचा आईचा आरोप…
अभिनेता शाहरुख खानला सरकारने पुरवली Y+ स्कॉट सुरक्षा; कारण…
Live Video: अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारला इटलीमध्ये अपघात; दोघांचा मृत्यू…
प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक अवस्थेत आढळला मृतदेह…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!