
पुणे शहरात वॉचनमचा खुनाचा प्रयत्न करणारे दोघे २४ तासांत अटक…
पुणे (संदिप कद्रे): वॉचमनचा खुनाचा प्रयत्न करणाऱ्या दोन अनोळखी आरोपींना निष्पन्न करून २४ तासात अटक करण्यात बिबवेवाडी तपास पथकाला यश आले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.
फिर्यादी हे रम्यनगरी सोसायटी मधील दुकान लाईनमध्ये सिक्युरीटी गार्ड म्हणून डयुटीवर होते. दिनांक ०४/०८/२०२४ रोजी पहाटे ०५.०० वाजता फिर्यादी हे रम्यनगरी सोसायटीमधील कोठारे ज्वेलर्स समोर अंगावर शाल घेवून पडलेले ( झोपलेले) असताना दोन अनोळखी व्यक्तींनी येवुन फिर्यादीस लाथा मारल्या तसेच हातातील कोयत्याने फिर्यादीचे दोन्ही हातावर व डोक्यामध्ये जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने सपासप वार करून गंभीर जखमी केले. त्यामुळे फिर्यादीचा उजवा हात फॅक्चर झाला असून, डोक्यामध्ये वीस टाके पडले आहेत. फिर्यादीस मारहाण करणाऱ्या दोन अनोळखींपैकी एक अंगाने जाड असलेल्या इसमाने अंगामध्ये हुडी घातलेली होती व दुसऱ्या अंगाने सडपातळ असलेल्या एकाने तोंडाला रूमाल बांधलेला होता. अशा मजकुरचा जबाब दिलेने वरील प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
सदर गुन्हा दाखल गुन्हयातील अज्ञात आरोपींचा पोलिस उप निरीक्षक अशोक येवले, तपास पथकातील स्टाफ असे मा. मंगल मोढवे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक व मनोजकुमार लोंढे पोलिस निरीक्षक, बिबवेवाडी पोलिस ठाणे पुणे यांचे मार्गदर्शनाखाली आरोपींचा सीसीटीव्ही फुटेज चेक करून अनोळखी आरोपीचा शोध घेत असताना पोलिस अमंलदार प्रणय पाटील, सुमित ताकपेरे, आशिष गायकवाड, विशाल जाधव यांनी तांत्रिक विश्लेषणाचे मदतीने व त्यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहिती वरून तपास पथकातील आधिकारी व अमंलदार यांनी आरोपी
१) प्रतिक सुभाष बिबवे, वय २६ वर्षे रा.गणात्रा कॉम्प्लेक्स डी विंग, फ्लॅट १०, बिबवेवाडी कोंढवा रोड मार्केटयार्ड पुणे.
२) क्षितीज विनायक जैनाक वय २२ वर्षे रा.४०२,नवीपेठ गांजवे चौक जवळ, आप्पा पडवळ पथ पुणे. यांना ताब्यात घेवून त्यांचेकडे तपास करता त्यांनी दाखल गुन्हयातील फिर्यादी यास जुन्या भांडणाचे कारणावरून कोयत्याने वार केल्याचे निष्पन्न झालेने त्यांना गुन्हयात अटक करून त्यांचेकडून एक लोखंडी कोयता हस्तगत करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमितेशकुमार, सह पोलिस आयुक्त रजनकुमार शर्मा, अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उप आयुक्त आर राजा, परिमंडळ ५ पुणे शहर, सहा. पोलिस आयुक्त गोडसे, वानवडी विभाग पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मंगल मोढवे, पोलिस निरीक्षक गुन्हे मनोजकुमार लोंढे, तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलिस उप निरीक्षक अशोक येवले, पोलिस हवालदार संजय गायकवाड, संतोष जाधव, पोलिस अमंलदार प्रणय पाटील, सुमित ताकपेरे, आशिष गायकवाड, विशाल जाधव, शिवाजी येवले, ज्योतिष काळे, अभिषेक धुमाळ यांनी केली आहे.
Video: पुणे शहरात भर पावसात महिला पोलिस अधिकाऱ्याकडून वाहतूक नियंत्रण…
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणाला नवं वळण; आणखी दोघांना अटक…
पुणे शहरातील गणेशोत्सवासाठी पोलिस आयुक्तांचा मोठा निर्णय…
पुणे शहरात पीएमटी बसचालकाला पोलिसाने केली मारहाण; कारण…
पुणे पोलिसांनी चोरी व गहाळ झालेले मोबाईल नागरिकांना केले परत…

