एकतर्फी प्रेमातून नगरसेवकाच्या मुलीची कॉलेजमध्ये हत्या…

बंगळूरू (कर्नाटक): एकतर्फी प्रेमातून एका युवतीची (वय २४) कॉलेजमध्येच हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. काँग्रेसचे नगरसेवक निरंजन हिरमेठ यांची मुलगी नेहा हिची हत्या फय्याझ या तिच्या कॉलेजातील युवकाने केली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

नेहा हिरमेठ हिच्या हत्याची घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. बी. व्ही. भूमारेड्डी इंजीनिअरिंग आणि तंत्रज्ञान कॉलेजमध्ये ही हत्या झाली. नेहा ही एमसीएच्या पहिल्या वर्षाला शिकत होती. फय्याझ हा बीसीएच्या पहिल्या वर्षाला होता. नेहा कॉलेजमधून बाहेर आल्यानंतर त्याचे तिच्याशी भांडण झाले. त्यानंतर त्याने तिच्यावर चाकूने हल्ला केला. ती पळण्याचा प्रयत्न करत असताना त्याने तिला पकडले आणि तिच्या मानेवर अनेकवेळा चाकूने वार केले. अनेक विद्यार्थी मदतीला धावल्यानंतर फय्याझने पळ काढला.

नेहा रक्ताच्या थारोळ्यात पडली होती. तिला रुग्णालयात नेण्यात आले पण गंभीर जखमी अवस्थेतच तिचा मृत्यू झाला. फय्याझ हा तिला सातत्याने त्रास देत होता. तिने त्याला नकारही दिला. नकारामुळे संतापून त्याने हे कृत्य केले. आपल्याला नकार देणाऱ्या मुलीला आपण मारून टाकू असे त्याने मित्रांना सांगितल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी फय्याझ याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. दरम्यान, अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने या कॉलेजच्या बाहेर निदर्शने करत आरोपीविरोधात कठोर कारवाईची मागणी केली.

पुणे शहरात एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात युवतीवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न…

एकतर्फी प्रेम! पोलिस अधिकारी होण्याचे स्वप्न राहिले अधुरे…

एकतर्फी प्रेम! लग्नाच्याच दिवशी नवरीने घेतला जगाचा निरोप…

धक्कादायक! एकतर्फी प्रेमातून युवतीच्या गुप्तांगावर झाडल्या गोळ्या…

एकतर्फी प्रेमातून महाविद्यालयीन युवतीचा घेतला जीव…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!