छत्रपती संभाजीनगर हादरलं! अल्पवयीन मेहुणीवर बलात्कार…

छत्रपती संभाजीनगर : अल्पवयीन मेहुणीला लग्नाचे आमिष दाखवून बाहेरगावी घेऊन गेल्यानंतर तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. कन्नड ग्रामीण पोलिस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

एका 20 वर्षीय आरोपीचा 3 वर्षांपूर्वी विवाह झाला होता. लग्नानंतर सासुरवाडीला तो येत असल्यामुले अल्पवयीन मेव्हणीसोबत त्याने जवळीक साधली. आरोपीने अल्पवयीन मेहुणीला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात ओढले. 22 मे रोजी आठवडी बाजाराच्या निमित्ताने आरोपीने पीडितेस तिच्या भावासह बाजार करण्यासाठी कन्नड येथे घेऊन आला. भावाला दुसरीकडे पाठवून पीडितेस फूस लावून मोटारसायकलने सातारा जिल्ह्यातील मयनी (धोंडेवाडी) येथे घेऊन गेला.

आरोपीने अल्पवयीन मेहुणीवर वारंवार बलात्कार केला. 2 जुलैला आरोपी पीडितेला कन्नड तालुक्यातील गावी घेऊन आला. नातेवाईकांनी याप्रकरणी माहिती मिळताच आरोपी आणि पीडितेस कन्नड ग्रामीण पोलिसांच्या स्वाधीन केले. याप्रकरणी कन्नड ग्रामीण पोलिस ठाण्यात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास पोलिस करत आहेत.

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!