
घाटंजी तालुक्यात अल्पवयीन युवतीवर अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल…
अयनुद्दीन सोलंकी/घाटंजी (यवतमाळ) : घाटंजी तालुक्यातील अंजी (नृसिंह) येथील एका 15 वर्षीय पिडीतेवर शेतात अत्याचार केल्या प्रकरणी आरोपी विवेक ठाकरे विरुद्ध अपराध क्रंमाक 1053/2024 भारतीय न्याय संहिता कलम 65 (1) 69 सह कलम पोक्सो ॲक्ट नुसार घाटंजी पोलिस ठाण्यात ठाणेदार निलेश सुरडकर यांनी गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी विवेक ठाकरे यांस घाटंजी पोलिसांनी अटक केली असून घाटंजी पोलिस ठाण्याचे ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक शशिकांत नागरगोजे पुढील तपास करीत आहे.
घाटंजी तालुक्यातील अंजी (नृसिंह) येथील 15 वर्षीय पिडीता 8 डिसेंबर 2024 रोजी विवेक ठाकरे यांच्या शेतात कामा निमीत्त गेली होती. तेथे आरोपी विवेक ठाकरे याने 15 वर्षीय पिडीत मुलीचे कपडे काढून लग्नाचे आमिष दाखवून तिच्या सोबत शारिरीक संबंध प्रस्थापित केले होते. पिडीतेने याबाबत आईला सांगितले. पिडीतेच्या कुटूंबियांनी चर्चा करून नंतर घाटंजी पोलिस ठाण्यात पिडीतेने जबानी रिपोर्ट दिला. त्यावरुन आरोपी विवेक ठाकरे विरुद्ध विविध कलमानुसार घाटंजी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल केले आहे.
घाटंजी पोलिस स्टेशनचे ठाणेदार तथा पोलिस निरीक्षक निलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उप निरीक्षक शशिकांत नागरगोजे पुढील तपास करीत आहेत.
योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ हत्येप्रकरणी पोलिसांना मोठं यश…
बीड! सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात दोघांना अटक, अधिकाऱ्याचे निलंबन…
पोलिस असलेल्या वर्गमित्राने मैत्रिणीची हत्या केली अन् मृतदेह…
हृदयद्रावक घटनेने पुणे हादरले! नवजात बालकाच्या तोंडावर चक्क प्लास्टिकची पिशवी बांधली अन्…
हृदयद्रावक! ट्रॅक्टरच्या गिअरवर पडला पाय अन् दोन बहिणींचा चिरडून मृत्यू…

