
छत्रपती संभाजीनगरमध्ये कंपनीला भीषण आग; सहा कामगारांसह श्वानाचा मृत्यू…
छत्रपती संभाजीनगर : वाळुज एमआयडीसीमध्ये ग्लोव्हज बनवणाऱ्या कंपनीत शनिवारी (ता. ३०) मध्यरात्री अडीचच्या सुमारास भीषण आग लागली. या आगीत सहा जणांचा होरपळून मृत्यू झाला आहे. या आगीत 10 जण अडकले होते. ज्यात 6 जणांचा जागीच आगीत होरपळून मृत्यू झाला आहे. कारखान्यातून बाहेर पडण्याच्या मुख्य गेटवरच आग लागल्याने कामगारांना बाहेर पडता न आल्यामुळे सहा जणांना जीव गमवावा लागला आहे.
अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, शनिवारी रात्री अडीचच्या सुमारास आग लागल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी दाखल होताच पाहिलं तर पूर्ण कंपनीत आग भडकली होती. या घटनेत सहा जणांचा मृत्यू झाला आहे. आग लागली तेव्हा कंपनी बंद होती आणि १० ते १५ कर्मचारी झोपले होते. आग भडकल्याचं लक्षात येताच काही जण बाहेर पडण्यात यशस्वी झाले पण किमान पाच ते सहा जण आत अडकले. आगीचे नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही.
आगीत बचावलेल्या अली अकबर यांनी सांगितले की, ‘आम्ही सर्वजण कंपनीत झोपलो होतो. कंपनीतील काम देखील बंद झाले होते. आमच्यातील एकजण रात्री बारा वाजेच्या सुमारास आला आणि तो देखील झोपी गेला. थोड्या वेळाने आम्हाला गरम वाटायला लागले. त्यामुळे नेमकं काय झाले हे पाहण्यासाठी आम्ही उठलो. त्यावेळी कंपनीत आग लागल्याचे दिसले. आम्ही सर्वांना झोपेतून उठवले. आग लागल्याने कंपनीत एकच गदारोळ उठला आणि सगळे ओरडू लागले. बाहेर निघण्याच्या मार्गावरच आग लागल्याने बाहेर पडणे अशक्य झाले होते. याचवेळी आम्ही कंपनीत असलेली एक सीडी लावून कंपनीचे वरील पत्रा बाजूला करून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. पत्र्यावर येऊन एका झाडाच्या मदतीने आम्ही चार जण बाहेर पडलो. मात्र, इतर लोकांना बाहेर पडणं अशक्य झाले आणि ते अगीतीच अडकले.’
दरम्यान, चार-पाच जणांनी कारखान्याच्या खालच्या बाजूने पत्रा तोडून बाहेर पडत जीव वाचवला. मात्र, यातील 6 जणांना जीव वाचवता आला नाही आणि त्यांचा या आगीत होरपळून मृत्यू झाला. याचवेळी कंपनीत एका कुत्रा देखील होता आणि त्याचा देखील आगीत होरपळून मृत्यू झाला आहे.
हृदयद्रावक! गरम पाण्याचे पातेले अंगावर उलटल्याने चिमुकलीचा मृत्यू…
बस आणि डंपरची समोरासमोर धडक; 13 जणांचा होरपळून मृत्यू…
हृदयद्रावक! घराला लागलेल्या आगीत अंध वृद्धाचा होरपळून मृत्यू…
मुंबईमध्ये इमारतीच्या पार्किंगमध्ये भीषण आग; सात जणांचा होरपळून मृत्यू…
पिंपरी-चिंचवडमध्ये फटाक्याच्या लागलेल्या आगीत सात महिलांचा मृत्यू….
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

