
कुलदीपचा मृतदेह लटकलेला दिसताच नातेवाईकांना बसला धक्का…
नाशिक : मालेगाव येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयात टायपिंगच्या परीक्षेसाठी चोपडा तालुक्यातील चहार्डी येथून आलेला विद्यार्थी बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. कुलदीप उर्फ भटू सुधाकर पाटील (वय 26) असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे.
कुलदीप याचा छावणी पोलिस स्टेशन समोर सुरु आलेल्या बांधकाम इमारतीच्या एका खोलीत गळफास आणि कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. स्वतःच्या शर्टने गळफास घेतल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले असून त्याने आत्महत्या का केली असा प्रश्न त्याचे पालक आणि नातेवाईकांना पडला आहे.

पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’
जळगावच्या चोपडा तालुक्यातील चाहर्डी येथील कुलदीप पाटील हा मालेगावच्या तंत्रनिकेतन महाविद्यालयात 19 जून रोजी टायपिंगची परीक्षा देण्यासाठी आला होता. दुपारी 11 ते 12.30 या वेळेत त्याने टायपिंगची परीक्षा दिली. परीक्षा दिल्यानंतर पेपर चांगला दिल्याचे त्याने पालकांना सांगितले. मात्र त्यानंतर कुलदीप घरी परतला नाही. त्यामुळे त्याला अनेक वेळा फोन करण्यात आले. मात्र, त्याचा मोबाइल स्विच ऑफ येत होता त्यामुळे त्याचे पालक चिंतीत झाले. दुसऱ्या दिवशी कुटुंबीय आणि काही नातेवाइकांनी त्याचा मालेगावसह इतर ठिकाणी शोध घेतला.
कुलदीपचा शोध न लागल्याने पालकांनी कॅम्प भागात असलेल्या छावणी पोलिस स्टेशन मध्ये कुलदीप बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. दरम्यान, छावणी पोलिस ठाण्यासमोर बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या एका खोलीतून दुर्गंधी येत असल्याची माहिती पोलिसांना देण्यात आली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी नागरिकांसह खोलीत प्रवेश केला असता खोलीतील पाइपाला शर्टने गळफास घेतलेला तरुण दिसून आला. त्याचा मृतदेह कुजलेला होता. याची माहिती बेपत्ता कुलदीपच्या नातेवाइकांना देण्यात आली. पालक आणि नातेवाईकांना मोठा मानसिक धक्का बसला आहे. कुलदीपने आत्महत्या का केली? त्याचा घातपात तर करण्यात आला नाही ना? अशी शंका उपस्थित केली जात आहे. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मित मृत्युची नोंद करून तपास सुरु केला आहे.
नाशिकमध्ये कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नका: संदिप कर्णिक
नाशिक जिल्ह्यात अनैतिक संबंधातून काढला पतीचा काटा…
नाशिकमध्ये सराईत गुन्हेगाराला पोलिसांनी ठोकल्या बेड्या अन्…
नाशिकमध्ये दारू पिताना मित्राला दगडानं ठेचून मारलं; मानवी कवट्या अन् हाडं…
नाशिकमध्ये एक व्यक्ती पोलिसांची गाडी किंवा पोलिस दिसताच काढता पाय घ्यायचा…
धक्कादायक! नाशिकमध्ये जिवलग मित्रांनी एकाच वेळी घेतला जगाचा निरोप…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

