
करोडपती झालेल्या पोलिस उपनिरीक्षकाची होणार चौकशी…
पुणे : ड्रीम इलेव्हन (Dream 11) याऑनलाईन फँटसी गेममुळे तब्बल दीड कोटी रुपयांची रक्कम बक्षीस म्हणून मिळाली म्हणून पिंपरी- चिंचवड पोलिस आयुक्तालयातील उपनिरीक्ष सोमनाथ झेंडे चर्चेत आले आहेत. पण, पोलिस उपायुक्तांकडून या दीड कोटी बक्षीस विजेत्या पोलिस उपनिरीक्षकाची चौकशी करण्यात येणार आहे.
पोलिस उपनिरीक्षक सोमनाथ झेंडेंची आता पोलिस उपायुक्तांकडून चौकशी होणार आहे. प्रशासकीय तसेच कायदेशीर बाबी तपासून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असे पिंपरी चिंचवड पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
दरम्यान, झेंडे यांना पहिल्यापासून क्रिकेट आवडत आहे. गेल्या दोन ते तीन महिन्यापासून ड्रीम इलेव्हन या ऑनलाइन गेमचे वेड लागले होते. विश्वचषकातील खेळाडूंचा अभ्यास करत ते ड्रीम इलेव्हनवर टीम तयार करत होते. बांगलादेश विरुद्ध इंग्लंड या क्रिकेट सामन्यावर ड्रीम इलेव्हनची टीम तयार केली आणि ती अव्वल आली. त्यात झेंडे यांना तब्बल दीड कोटी रुपयांचे बक्षीस लागले आहे.
झेंडे यांनी दोन- तीन महिन्यांपासून ड्रीम इलेव्हनवर खेळण्यास सुरुवात केली. झेंडे यांच्या खात्यावर पैसे येण्यास सुरूवात झाली आहे. झेंडे यांनी बक्षीस जिंकल्याने कुटुंबात आनंदाचे वातावरण आहे. झेंडे यांनी निवडलेल्या टीमला रँकिंग मिळाले आणि तब्बल दीड कोटी रुपयांचे बक्षीस मिळाले आहे. या रकमेतील टीडीएस वजा करून जिंकलेली रक्कम त्यांच्या खात्यावर जमा होण्यास सुरुवात झाली आहे. याच बक्षिसाच्या दीड कोटींमुळे आता झेंडे यांना खात्यातंर्गत चौकशीला सामोरे जावे लागणार आहे.
ड्रीम इलेव्हनवर दीड कोटी जिंकल्यानंतर सोमनाथ झेंडे करोडपती झाले आहेत. पण, ऑनलाईन गेमिंग धोकादायक असल्याचं झेंडे यांनी सांगितले आहे. अशा गेम्सपासून आपल्याला सावध राहिले पाहिजे, कारण याचे व्यसन लागून आर्थिक नुकसानही होऊ शकते, असे आवाहन त्यांनी केले आहे. हे पैसे मिळाले असले तरी आपण पोलिस दलात राहणार आणि देशसेवा करणार आहे. मिळालेल्या रकमेपैकी काही रक्कम समाजकार्यासाठी वापरणार आहे, तसेच हे पैसे मुलांच्या शिक्षणासाठी वापरणार असल्याचे झेंडे यांनी सांगितले आहे.
पिंपरी-चिंचवडच्या पोलिसकाकाने जिंकले दीड कोटी रुपये; पण…
पुणे जिल्ह्यात पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या युवतीची आत्महत्या…
पोलिस दलात SPचे अधिकार आणि कार्य काय? पगार किती; घ्या जाणून…
पोलिसकाकाची घराच्या अंगणात स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…