रोमिओची धुलाई; अब तू मर और बोल आय लव यू…

आग्रा (उत्तर प्रदेश): एका रोड रोमिओला दोन युवतींनी भररस्त्यातच बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. आग्रा शहरातील कमला नगर पोलिस ठाणे परिसरातील हा व्हिडिओ असल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणाचा तपास पोलिस करत आहेत.

एका रोड रोमिओला दोन युवतींनी चपलेने मारहाण केली. युवक म्हणत होता की, ‘मी तुझ्या शिवाय नाही जगू शकणार, I Love You. तब्बल अर्धा तास रस्त्यावर हा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता.’ संबंधित घटनेचा कुणीतरी व्हिडीओ शुट करुन सोशल मीडियावर व्हायरल केला आहे.

प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, दोन मुली रस्त्यावरुन जात होत्या. यावेळी जवळच्या परिसरात राहणारा एक युवक त्यांचा पाठलाग करत होता. थोड्या वेळानंतर या मुलींना रस्त्यावर थांबवले आणि काहीतरी म्हणाला. यानंतर या मुली चांगल्याच संतापल्या आणि दोघांनी या मुलाला चपलेने मारहाण करण्यास सुरवात केली. मुलाला मारहाण करताना एक मुलगी पुन्हा पुन्हा बोलत होती “अब तू मर और बोल आय लव यू”. यावेळी तब्बल अर्धा तास रस्त्यावर हा हाय व्होल्टेज ड्रामा सुरू होता.

कमला नगर पोलिस ठाण्याचे प्रमुख विपिन कुमार यांनी सांगितले की, ‘दोन मुली आणि एक मुलाचा मारहाणीचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.’

प्रेम! पुन्हा तुझ्या आयुष्यात येणार नाही म्हणून मारली नदीत उडी…

रशियन महिला देवदर्शनाला आली अन् पडली भारतीय नागरिकाच्या प्रेमात…

प्रेम! भारतीय महिलेने प्रियकराला भेटण्यासाठी गाठले पाकिस्तान…

प्रेम! मामीने ठोकली भाच्यासोबत धूम अन् पुढे…

प्रियकर आणि प्रेयसी ओयो हॉटेलमध्ये अन् काही वेळानंतर…

हनीमूनला जाताना बेपत्ता झालेली नवरी अखेर सापडली…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!