हृदयद्रावक! विश्वास नांगरे पाटील यांनी नितीन देसाईंबद्दलच्या भावनांना करून दिली मोकळी वाट…
मुंबई : ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्यावर कर्जत येथील एन डी स्टुडिओ येथील जागेवर अंत्यसंस्कार करण्यात आले. नितीन देसाई यांच्या आत्महत्येनंतर हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी फेसबुकवर व्यक्त होत आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे.
‘तणावांचा एवढा मोठा डोंगर डोक्यावर आहे, याबद्दल एक शब्दही बोलला नाही. पोरगीच्या लग्नाची धावपळ त्याचा जीव तोडीत असेल म्हणून मीही खोदून विचारले नाही. आता मात्र मन खातंय का विचारलं नाही म्हणून?”, असे विश्वास नांगरे पाटील म्हणाले आहेत. ‘हा हळवा माणूस या पिसाळलेल्या स्वार्थाने आणि अर्थाने गुरफटलेल्या दुनियेत हारला आणि वैतागून, कंटाळून आणि संतापून न सांगता निघून गेला,’ असेही विश्वास नांगरे पाटील यांनी फेसबुक पोस्टमध्ये म्हणाले आहेत.
विश्वास नांगरे पाटील यांची फेसबूक पोस्ट जशीच्या तशी पुढीलप्रमाणेः
नितीन चंद्रकांत देसाई! हा पहाडासारखा दिसणारा, वृक्षासारखा ओतप्रोत भरलेला आणि जीवनाच्या अनेक पैलूंना आणि नियतीच्या अनेक रूपांना आपल्या प्रतिभेने आकृतिबंध करणारा अवलिया, अशी चटका लावणारी एक्सिट घेतोच कशी?
अनेक सांस्कृतिक, राजकीय, सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रमात नितीन भाऊ भेटायचा. मोकळा, रांगडा, दमदार आणि प्रेमळ गडी! भला मोठा गोतावळा, मित्रपरिवार आणि व्याप असताना हे कुठलं रितेपण अचानक त्याला गिळून गेलं, कळलंच नाही.
पोरगीच्या लग्नाचं निमंत्रण द्यायला माझ्या कार्यालयात आला, त्यावेळी फक्त आग्रह, प्रेम आणि जिव्हाळाच त्याच्या लांब पांढऱ्या झालेल्या दाढीतील थोड्याशा ओढवलेल्या चेहऱ्यातून ओघळत होता. पण त्याच्या जरा जास्तच खोल गेलेल्या डोळ्यांत वेदना आणि काळजी अधूनमधून डोकावतेय, असा उगाचच मला भास झाला. तणावांचा एवढा मोठा डोंगर डोक्यावर आहे याबद्दल एक शब्दही बोलला नाही. पोरगीच्या लग्नाची धावपळ त्याचा जीव तोडीत असेल म्हणून मीही खोदून विचारले नाही. आता मात्र मन खातंय का विचारलं नाही म्हणून?
सिनेमातलं त्याचं योगदान जगाला माहीत आहे. पण मला जवळून पाहता आलं त्याचं अचूक नियोजन. ज्यावेळी मोदी साहेबांच्या 2014 च्या प्रचंड मोठ्या सभेचे नेटकं आणि देखणं स्टेज त्यांनी बनवलं! आमच्या सुरक्षेच्या सूचना आणि त्याची कलात्मकता याची सुलभ सांगड घातली गेली.
कोल्हापूरला आयजी असताना त्याने नवरात्रीच्या वेळी उभा केलेला देवीच्या नऊ रूपांचा अप्रतिम देखणा सेट त्याच्यासोबत पाहण्याची संधी मिळाली. कोल्हापूरकरांनी या अवलियाचा कौतुक सोहळा आयोजित केला होता आणि त्या कार्यक्रमात चित्रमहर्षी आनंदराव पेंटर स्मृती पुरस्कार कोल्हापूरकरांच्या वतीनं देण्याचं सौभाग्य मला मिळालं. पण सत्काराला उत्तर देताना त्याने त्याचा मुंबईच्या चाळीपासूनचा जीवनप्रवास उलगडला. आणि बापाच्या आठवणी सांगताना ढसाढसा रडला!
हा हळवा माणूस या पिसाळलेल्या स्वार्थाने आणि अर्थाने गुरफटलेल्या दुनियेत हारला आणि वैतागून, कंटाळून आणि संतापून न सांगता निघून गेला राव! निदान या देवमाणसाला असेल जर काही स्वर्ग वगैरे तिथं थोडा निवांतपणा मिळेल एवढंच अंबाबाईला साकडं…
नितीन देसाई यांच्या मुलीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाली…
नितीन देसाई यांच्या पार्थिवाला लेकीनं दिला खांदा; सेलिब्रिटींनी फिरवली पाठ…
नितीन देसाई यांच्या पत्नीने केले गंभीर आरोप; तक्रारीत म्हटले की…
नितीन देसाई यांच्या मृत्यूच्या रात्री नेमकं काय घडलं? पाहा सविस्तर…
नितीन देसाई यांच्या आत्महत्येपूर्वी ११ ऑडिओ क्लिप; पहिले वाक्य…
नितीन देसाई यांच्या आत्महत्येची मित्राने सांगितली कहाणी; अहवाल समोर…
मोठी बातमी! सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची आत्महत्या…
मला जगणं असह्य झालंय म्हणून पती रडत होते: नेहा देसाई
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…