सायना नेहवाल अन् पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट; फुलराणी म्हणाली…

नवी दिल्ली: भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवाल आणि तिचा पती पारुपल्ली कश्यप यांनी घटस्फोट घेतला आहे. सायना नेहवालने रविवारी (ता. १३) रात्री सोशल मीडियावर पारुपल्ली कश्यपसोबत घटस्फोट घेतल्याची पोस्ट करत चाहत्यांना धक्का दिला. घटस्फोट घेण्यामागील कारण अद्याप समोर आलेले नाही. सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचे लग्न 2018 साली झाले होते. त्यानंतर 7 वर्षांनी दोघांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

सायना नेहवाल हिने म्हटले आहे की, ‘आयुष्य कधीकधी आपल्याला वेगळ्या दिशेने घेऊन जाते. खूप विचार केल्यानंतर पारुपल्ली कश्यप आणि मी वेगळे होण्याचा निर्णय घेतला आहे. आम्ही दोघंही स्वत:साठी आणि एकमेकांसाठी शांतता, प्रगती आणि विरामाचा मार्ग निवडत आहोत. या आठवणींसाठी मी नेहमीच कृतज्ञ आहे आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देते.’

दोघांच्या वेगळे होण्याबद्दल कोणतीही चर्चा किंवा अफवा नव्हत्या. त्यामुळे यामागील नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नाही. सायनाने पुढे लिहिले, “मी या आठवणींसाठी नेहमीच आभारी राहीन आणि पुढे जाताना फक्त चांगल्याचीच अपेक्षा करते. अशा वेळी आमच्या गोपनीयतेचा आदर केल्याबद्दल आणि ती समजून घेतल्याबद्दल धन्यवाद.”

दरम्यान, सायना आणि पारुपल्ली यांचे लग्न 14 डिसेंबर 2018 रोजी झाले. हरियाणातील हिसार येथे जन्मलेली सायना पारुपल्ली कश्यपपेक्षा 3 वर्षांनी लहान आहे. लग्नाच्या वेळी पारुपल्ली 31 वर्षांच्या होता आणि सायना नेहवाल 28 वर्षांची होती. वयाच्या 30 व्या वर्षी सायनानेही राजकारणात प्रवेश केला, सायना 2020 मध्ये भाजप पक्षात सामील झाली.

बॅडमिंटनपटू सायना नेहवालने अनेक मोठे विक्रम आपल्या नावार केले आहेत. सायनाचे आई-वडिलदेखील बॅडमिंटन खेळाडू होते. सायनाने हैदराबादच्या एलबी स्टेडियमधून बॅडमिंटनची ट्रेनिंग घेतली. सायनाने द्रोणाचार्य पुरस्कार प्राप्त एसएम आरिफ यांच्याकडून बॅडमिंटनचे धडे घेतले. सायनानेच भारताला बॅडमिंटनचे पहिले ऑलिम्पिक पदक मिळवून दिले होते. सायना नेहवालला 2009-10 मध्ये राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार, 2010 मध्ये पद्मश्री आणि 2016 मध्ये पद्मभुषण या पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले. सायनाने 2009 मध्ये इंडोनेशिया ओपनचे जेतेपद मिळवले होते. अशी कामगिरी करणारी ती पहिलीच भारतीय होती. याशिवाय सायनाने 2010 मध्ये सिंगापूर ओपन, इंडिया ओपन ग्रँड प्रिक्स गोल्ड, हाँग काँग सुपर सीरीज यांसारख्या मोठ्या स्पर्धांमध्ये विजय मिळवला आहे.

टेनिसपटू राधिका यादव हत्याकांडात धक्कादायक खुलासे समोर…

ऐश्वर्यासोबतच्या घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक बच्चनचं उत्तर; मी पुन्हा लग्न करतोय…

संजय कपूर यांचे निधन; करिष्माच्या घटस्फोटीत नवऱ्याच्या मृत्यूचे धक्कादायक कारण…

अभिनेत्री उर्मिला मातोंडकर हिने घेतला घटस्फोटाचा निर्णय…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!