श्रीलंकेतील महिलेचे फेसबुकवरून जुळले भारतीय युवकासोबत प्रेमसंबंध अन्…
चित्तूर (आंध्र प्रदेश) : देशभर सध्या पाकिस्तानी महिला सीमा हैदर, भारतीय महिला अंजू यांच्या प्रेमप्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. श्रीलंकेतल्या एका महिलेचे भारतीय व्यक्तीवर फेसबुकच्या माध्यमातून प्रेम जडले. भारतात येऊन तिने युवकासोबत लग्नही केले आहे.
चित्तूर जिल्ह्याच्या व्यंकटगिरीकोटा मंडळातल्या अरिमाकुलापल्ले गावात लक्ष्मण राहतो. फेसबुकच्या माध्यमातून त्याची ओळख कोलंबो (श्रीलंका) शहरातल्या विघ्नेश्वरी नावाच्या महिलेशी झाली. पुढे काही दिवसात ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांच्या फेसबुक मैत्रीला तब्बल सहा वर्षं पूर्ण झाली. दोघांनी पुढे विवाहाचा निर्णय घेतला. विघ्नेश्वरी टुरिस्ट व्हिसा घेऊन भारतात आली. गावातल्या ज्येष्ठ व्यक्तींनी त्या दोघांनाही त्यांची आणि ओळख आणि प्रेमाबद्दल विचारले. त्यांचा विवाहाचा निर्णय पक्का असल्याचे कळल्यावर त्या सर्वांनी त्यांना पाठिंबा दिला. 20 जुलै रोजी गावातल्या एका मंदिरात दोघांचे लग्न झाले आहे.
दोघांच्या विवाहाची बातमी सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर चित्तूर पोलिस अधीक्षक कार्यालयातील पोलिस अधिकाऱ्यांनी या दाम्पत्याला चौकशीसाठी बोलावले. विघ्नेश्वरी यांचा टुरिस्ट व्हिसा 6 ऑगस्ट रोजी संपत असल्याने त्यांनी त्या दिवशी किंवा त्यापूर्वी देश सोडणे गरजेचे असल्याचं पोलिस अधिकाऱ्यांनी सांगितले. भारतीय युवकासोबत विवाह केल्यामुळे विघ्नेश्वरी पुढील कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करणार आहे.
अंजूला मिळाले कोट्यावधींचे गिफ्ट अन् सुरक्षेला दोघे जण…
Video: अंजूने पाकिस्तानातून अरविंदला फोन करून केली शिवीगाळ…
पाकिस्तानी महिला सीमा हैदर हिने विचारला थेट राष्ट्रपतींनाच प्रश्न…
सीमा हैदर हिला सचिन आवडत नाही तर दुसरीकडे बीडी पिण्याचे व्यसन…
परदेशी प्रेम! बांग्लादेशी ‘जूली’ ‘सीमा’ ओलांडून भारतात आली अन् पुढे…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…