
पुणे शहरातील एफसी रोडवर टोकाचं पाऊल; नोकरी गेली म्हणून…
पुणेः पुणे शहरातील वर्दळीच्या फर्ग्युसन कॉलेज (एफसी) रोडवरील खाऊ गल्लीत शनिवारी रात्री एका युवकाने नोकरी गेल्याच्या नैराश्यातून स्वतःच्या गळ्यावर ब्लेडने वार करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. आदित्य सातपुते (वय ४१) यांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. रात्री सुमारे 9.15 वाजण्याच्या सुमारास घटना घडली असून, वेळीच मदत मिळाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.
आदित्य सातपुते हे मूळचे मुंबईतील बोरिवली परिसरातील रहिवासी असून, सध्या पुण्यातील भोसले नगर येथे वास्तव्यास होते. नोकरी गेल्यामुळे ते मानसिक तणावाखाली होते. या नैराश्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलत एफसी रोडवरील खाऊ गल्लीत स्वतःच्या हाताने गळ्यावर ब्लेडने वार केले. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे तेथील नागरिक आणि दुकानदारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेनंतर आजूबाजूच्या नागरिकांनी तत्काळ मदत करत जखमी अवस्थेत असलेल्या सातपुते यांना जवळच्या खाजगी रुग्णालयात दाखल केले. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पुढील तपास सुरू केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नोकरी गेल्यामुळे आलेल्या मानसिक तणावातून सातपुते यांनी हे कृत्य केल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तसेच, या घटनेमागे अन्य काही कारण आहे का, याचाही तपास पोलीस करत आहेत.
पुणे जिल्ह्यातील पत्नीची एसयूव्हीखाली चिरडून कर्नाटकात केली निर्घृणपणे हत्या…
पुणे पोलिस आयुक्तालयांतर्गत होणार पाच नवीन पोलिस ठाणी…
पुणे हादरलं! लघुशंकेसाठी थांबलेल्या युवकाची ठेचून हत्या…
पुणे शहरात युवकाची धारदार हत्याराने सपासप वार करून हत्या…
पुणे! मैत्रिणीने मेसेज करून भेटायला बोलावले अन् घरच्यांनी घेतला जीव…

