फरार गुन्हेगाराला पकडण्यासाठी पोलिसांनी ठेवलं 50 पैशांचं बक्षीस; कारण…

जयपूर (राजस्थान) : पोलिस फरार गुन्हेगारांना पकडण्यासाठी अनेकदा मोठमोठ्या रकमेची बक्षिसं जाहीर करतात. पण, राजस्थान पोलिसांनी एका फरार गुन्हेगारावर फक्त 50 पैसे इनाम घोषित केल्यामुळे हा चर्चेचा विषय बनला आहे.

गुन्हेगाराची माहिती देण्यासाठी किंवा त्याला पकडून देण्यासाठी मोठं इनाम जाहीर केल्यावर त्या गुन्हेगारांकडून त्या इनाम रकमेची माहिती देऊन स्वतःचा दबदबा किती आहे, हे सोशल मीडियावर व्हायरल केले जाते. या पार्श्वभूमीवर, गुन्हेगारांना स्वतःची लायकी दाखवण्यासाठी पोलिस अधीक्षक देवेंद्र कुमार बिश्नोई यांनी फक्त 50 पैसे इनाम जाहीर करण्याची क्लृप्ती लढवली आहे. आपल्याला पकडण्यासाठी जाहीर झालेल्या इनाम रकमेवरून गुन्हेगारांनी स्वतःला डॉन समजू नये, यासाठी पोलिसांनी ही क्लृप्ती काढली आहे.

फरार आरोपींना पकडण्यासाठी पोलिस 500 रुपयांपासून अगदी लाखभर रुपये किंवा त्याहून जास्त रकमेचं इनाम जाहीर करत असतात; मात्र या इनाम रकमेचा उपयोग आरोपींना पकडण्यासाठी कधीच झाला नाही, असे लक्षात आले. उलट, गुन्हेगार स्वतःवर लावलेल्या या इनाम रकमेचा वापर करून सोशल मीडियावर स्वतःचा रुबाब किती आहे, हे व्हायरल करतात.

देवेंद्र बिश्नोई म्हणाले, ‘इनाम रकमेचा गुन्हेगारांना पकडण्यासाठी कधीही उपयोग होत नाही. पोलिसांच्या खबऱ्यांचं तंत्र गुन्हेगारांना पकडण्यासाठी उपयोगी ठरते; मात्र गुन्हेगार त्या आधारे स्वतःचा रुबाब किती आहे, हे दाखवण्यात यशस्वी होतात. त्यामुळे त्यांना त्यांची लायकी दाखवण्यासाठी 50 पैसे इनाम रक्कम जाहीर करायला सुरुवात केली. त्यांची लायकी 50 पैशांएवढीच आहे, असा संदेश त्यातून जातो. 50 पैसे इनाम ठेवल्याने त्याचा गुन्हेगारांना स्वतःचा दबदबा तयार करण्यासाठी उपयोग होणार नाही. समाजातही संदेश जातो, की गुन्हेगारांची लायकी नाही. समाजाने निर्भयतेने पोलिसांना मदत करावी आणि बदमाशांना पकडण्यासाठी मदत करावी.’

दरम्यान, पोलिस ठाण्याला हव्या असलेल्या योगेश या गुन्हेगारावर 50 पैशांचे इनाम जाहीर करण्यात आले आहे. तो सिलारपुरी गावातला असून, आर्म्स अॅक्टसंदर्भातल्या प्रकरणात फरार आहे. संबंधित आदेश जाहीर झाल्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत.

पोलिसकाकाचे लग्नाचे वय आणि चांगल्या स्थळाच्या सुट्टीचा अर्ज व्हायरल…

पाकिस्तानने अभिनंदन यांना दिलेल्या चहाचं बिल केले व्हायरल…

Video: पोलिसकाकाच्या पत्नीने व्यक्त केलेल्या भावना नक्कीच ऐकण्यासारख्या….

पोलिसकाकाच्या पत्राने पोलिस दलात उडाली खळबळ…

पोलिसकाकाचा अमेरिकेत डंका! 40 अंडी, एक किलो चिकन…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!