Video: स्लो मोशनच्या नादात Live मृत्यू झाला कॅमेऱ्यात कैद…

लखनौ (उत्तर प्रदेश): लॉकडाउनपासून सोशल मीडिया हे मनोरंजनाबरोबरच कमाईचेही साधन झाले आहे. सोशल मीडियावर अकाऊंट असणारे अनेकजण रील करत असतात. पण, रीलच्या नादात एका युवकाचा जीव गेला आहे. संबंधित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

बाराबंकी येथे रेल्वे रुळावर शूट करत असतानाच त्याला ट्रेनने धडक दिली. धडक इतकी जबरदस्त होती की, त्याच्या शरिराचे अक्षरश: तुकडे झाले. घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिस घटनास्थळी दाखल झाले होते. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. मृतदेह पाहताच कुटुंबीयांनी हंबरडा फोडला. पोलिस युवकाच्या मित्रांची चौकशी करत आहेत.

जहांगीराबादमधील दौलतपुरा गावात मुन्ना यांचे सलून आहे. त्यांचा 16 वर्षीय मुलगा फरमान गुरुवारी आपले तीन मित्र शोएब, नादिर आणि समीर यांच्यासह बारावफातचा जुलूस पाहण्यासाठी शाहपूर येथे चालला होता. यादरम्यान दामोदरपूर गावाजवळ रेल्वे क्रॉसिंगवर रील बनवण्यासाठी तो गेला. त्याचा एक मित्र रील शूट करत होता. फरमानने मित्राला स्लो मोशनमध्ये रील शूट करण्यास सांगितले. यानंतर तो रुळाच्या शेजारी चालू लागला.

फरहान रुळाच्या शेजारी चालताना 7 सेकंदही झाले नसतील तोवर दरभंगावरुन येणाऱ्या ट्रेनने त्याला धडक दिली. ट्रेन इतक्या वेगात होती की क्षणात फरमान खाली कोसळला आणि शरिराचे तुकडे झाले. एका क्षणात ही घटना घडली आणि मित्राच्या मोबाईलमध्ये फरमानच्या मृत्यूचा लाईव्ह व्हिडीओ रेकॉर्ड झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Video: युवतीला चुकीचे इंजेक्शन अन् आई-वडिलांसमोरच सोडला जीव…

Live Video: अभिनेत्री गायत्री जोशीच्या कारला इटलीमध्ये अपघात; दोघांचा मृत्यू…

Video: पोलिसाने पळत जाऊन घातली चोरट्यांच्या दुचाकीला लाथ…

Live Video: बसमध्ये चढताना पाकीट कसे मारले जाते पाहा…

Video: अल्पवयीन मुलाने गुपचुप वडिलांची कार केली सुरू अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!