लग्नाच्या दिवशीच नवरीच्या प्रियकराने केला नवरदेवाचा खून…

अमरावती: अमरावती जिल्ह्यातील मोर्शी तालुक्यात लग्नाच्या दिवशीच नवरीच्या प्रियकराने नवरदेवाची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मृत युवकाचे प्रेयसीसोबत लग्न होत असल्याच्या रागातून ही हत्या केल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

दयाराम वरठी (वय ३४) असे अटक करण्यात आलेल्या आरोपी प्रियकराचे नाव आहे. तो मध्य प्रदेशातील बैतुल जिल्ह्यातील रहिवासी आहे. धरमू मयतीलाल उईके (वय २४) असे हत्या झालेल्या नवरदेवाचे नाव आहे. धरमू याचा २३ मे रोजी मध्य प्रदेशातील एका युवतीसोबत विवाह ठरला होता. घरात लग्नाची जोरदार तयारी सुरू होती. पण, लग्नाच्या आदल्या दिवशी गुरुवारी धरमू अचानक घरातून गायब झाला. तो कुठे गेला, कुणासोबत गेला? याची काहीच कल्पना घरच्यांना नव्हती.

लग्नाच्या आदल्या दिवशी गूढ पद्धतीने मुलगा धरमू गायब झाल्याने कुटुंबीय चिंताग्रस्त झाले. त्यांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. पण काहीच थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे त्यांनी मोर्शी पोलीस ठाण्यात जाऊन मुलगा बेपत्ता असल्याची तक्रार दिली. पोलिसांनीही धरमूचा शोध घेतला, पण त्यांनाही धरमूचा पत्ता लागला नाही. अखेर ऐन लग्नाच्या दिवशी अमरावतीच्या शिरखेड पोलीस स्टेशन हद्दीतील कवठाळ शेत शिवारातील एका विहिरीत धरमूचा मृतदेह आढळला. त्याची दगडाने ठेचून हत्या केल्याचे दिसून आले. विहिरीच्या बाजुला हत्या करण्यासाठी वापरलेला दगडाने माखलेला दगडही आढळून आला.

मोर्शी पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह विहिरीतून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी पाठवला. पोलिसांनी तातडीने तपासाची चक्र फिरवली अन् अवघ्या तीन तासात आरोपी दयाराम वरठीला अटक केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वरठी याचे धरमूच्या होणाऱ्या पत्नीसोबत प्रेमसंबंध होते. याच रागातून दयारामने लग्नासाठी फटाके आणण्याच्या बहाणा केला. त्यासाठी धरमूल दुचाकीवर बसवून निर्जनस्थळी घेऊन गेला. याठिकाणी आरोपीनं दगडाने ठेचून नवरदेवाची हत्या केली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

लग्नाच्या एक दिवस अगोदर कॉंग्रेस नेत्याचा मुलगा बेपत्ता…

Pahalgam Terror Attack Video: आठवडाभरापूर्वी लग्न अन् लेफ्टनंट पतीला सॅल्यूट मारुन म्हणाली, जय हिंद विनय!

सहाच महिन्यांपुर्वी लग्न झालेल्या सुनेने काढला सासूचा काटा; कारण आले समोर…

प्रेयसीचं लग्न ठरल्यानंतर शेवटचं भेटायला बोलावलं अन् झाला शेवट…

युवकाचे एकाच दिवसात दोन वेळा लग्न; प्रेयसी पोहचली घरी अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!