
धक्कादायक! हनिमूनच्या रात्री सासरच्यांनी महिलेची तपासली व्हर्जिनिटी अन्…
भोपाळ (मध्य प्रदेश): हुंड्यासाठी छळ आणि लग्नाच्या पहिल्या रात्रीच कौमार्य तपासण्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पीडितेच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
एका महिलेने इंदूर न्यायालयात तक्रार दाखल केली आहे. सासरच्या लोकांनी तिच्यावर ‘कौमार्य चाचणी’ (एक प्रक्रिया ज्यामध्ये मुलगी कोणाशीही जवळीक साधली आहे की नाही हे कळते, असा दावा केला जातो) करण्याचा प्रयत्न केला. या भयंकर प्रकाराची जिल्हा न्यायालयाने गंभीर दखल घेतली आहे. महिलेने आरोप केला आहे की, हनिमूनच्या रात्री सासरच्या लोकांनी तिची ‘कौमार्य चाचणी’ करण्याचा चुकीचा प्रयत्न केला, ज्यामुळे तिला गंभीर मानसिक आणि शारीरिक त्रास झाला. तक्रारीवरून जिल्हा न्यायालयाने तिच्या सासरच्यांविरुद्ध गुन्हा नोंदवण्याचे आदेश दिले आहेत. मध्य प्रदेशातील अशा प्रकारचे हे पहिलेच प्रकरण आहे, ज्यामध्ये ‘कौमार्य चाचणी’च्या प्रथेला कायदेशीर आव्हान देण्यात आले आहे.
डिसेंबर 2019 मध्ये पीडितेचा विवाह भोपाळमधील एका व्यक्तीशी झाला होता. लग्नानंतर गरोदर राहिल्यानंतर तीन महिन्यांतच तिचा गर्भपात झाला. नंतर नऊ महिने नऊ दिवस गर्भात राहिल्यानंतर तिने एका मृत मुलाला जन्म दिला. सध्या त्यांना एक मुलगी आहे. महिला व बालविकास विभागाच्या तपास अधिकाऱ्याने दिलेल्या गोपनीय अहवालात लग्नाच्या पहिल्या रात्री पीडितेच्या कौमार्य चाचणीसाठी सासरच्या लोकांनी अमानवी मार्गांचा अवलंब केला होता, अशी माहिती आहे. परिणामी तिला मानसिक आणि शारीरिक छळाचा सामना करावा लागला.
हनिमूनच्या रात्री नवऱ्याबाबत समजली खरी माहिती अन् तिने थेट…
हनिमूनची रात्र अन् नवरदेवाला आलेला पत्नीचा संशय ठरला खरा…
युवतीने केली 13 दिवसांमध्ये 3 लग्न अन् हनिमूनच्या वेळी…
हनिमूनच्या रात्रीच नवरी रडत-रडत पडली खोलीबाहेर…
हनिमूनच्या रात्रीपासूनच नवरीला त्रास सुरू; अखेर नको ते घडलं…

