FASTag नियमांत मोठे बदल, अन्यथा भरावे लागणार दुप्पट पैसे…

मुंबई: महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळातील (एमएसआरडीसी) सर्व टोल नाक्यांवर 1 एप्रिलपासून फास्टॅगद्वारेच टोल वसूल करण्यात येणार आहे. फास्टॅगशिवाय टोल भरणाऱ्या वाहनचालकांना दुप्पट शुल्क मोजावे लागेल. महामंडळाने याबाबत सख्त अंमलबजावणी सुरू केली आहे.

एमएसआरडीसीच्या टोल नाक्यांवर हायब्रीड पद्धतीने टोल वसुली केली जात होती. याद्वारे रोख रक्कम, स्मार्ट कार्ड, डेबिट कार्ड, पीओएस मशीन किंवा क्युआर कोडद्वारे टोल स्वीकारला जात होता. मात्र, आता या सर्व मार्गिका बंद करून त्या पूर्णपणे फास्टॅग मार्गिकांमध्ये रूपांतरित करण्यात आल्या आहेत.

फास्टॅग नसलेल्या वाहनधारकांनी लवकरात लवकर फास्टॅग स्टीकर खरेदी करून आपल्या वाहनावर लावण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अन्यथा, टोल नाक्यावर दुप्पट शुल्क भरावे लागेल. एमएसआरडीसीच्या 9 रस्ते प्रकल्पांतर्गत असलेल्या सर्व टोल नाक्यांवर हा निर्णय लागू होणार आहे. त्यामुळे वाहनचालकांनी प्रवासापूर्वी फास्टॅगची वैधता तपासावी जेणेकरून टोल भरताना अडचण येणार नाही.

FASTag नवीन नियम लागू; दंड टाळण्यासाठी काय करावे? घ्या जाणून…

Fastag चा बदलला नियम; तर भरावा लागेल दुप्पट टोल…

राज्यातील वाहनांच्या HSRP नंबर प्लेटबाबत महत्त्वाची बातमी…

जेसीबी वाहनावर अवैध कारवाई केल्याप्रकरणी उच्च न्यायालयाची नोटीस…

वाहनांना एचएसआरपी नंबर प्लेट बसवणं बंधनकारक, किंमत किती अन् कुठे मिळेल? घ्या जाणून…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!