बायकोच्या हट्टापायी नवऱ्याचा गेला मध्यरात्रीच जीव…

पानिपत (हरियाणा) : हरियाणातील पानिपत जिल्ह्यातील गोपाल कॉलनी येथील एका युवकाने रात्री 2 वाजता आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंट इन्स्टाग्रामवर एक स्टेटसही ठेवले होते. त्यामध्ये त्याने ‘आज रात्री 2 वाजता मी फाशी घेणार आहे, मी मेल्यानंतर माझ्या पत्नीला माझ्या मृतदेहाला हात लावू देऊ नका,’ असे म्हटले होते.

युवकाने इन्स्टाग्रामवर ठेवलेले स्टेटस रात्री त्याच्या कुटुंबीयांनी आणि मित्रांनी हे स्टेटस पाहिले नव्हते. सकाळी या तरुणाची आई त्याला उठवण्यासाठी त्याच्या खोलीत गेली असता खोली बंद दिसली. तिने अनेकदा दरवाजा वाजवला, पण आतून प्रतिसाद मिळाला नाही. यानंतर दाराला असलेल्या एका छोट्या जागेतून एका लहान मुलाला आत पाठवण्यात आले आणि दरवाजा उघडला. यावेळी मुलगा लटकलेला दिसला. हे पाहून कुटुंबीयांमध्ये मोठा धक्का बसला. पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.

मृताचा भाऊ मोनूने सांगितले की, मृत अमित हा त्याचा मावस भाऊ होता आणि तो मूळचा उत्तर प्रदेशातील शाहजहांपूरचा रहिवासी होता. त्याचे कुटुंब गेल्या 9 वर्षांपासून पानिपतच्या गोपाल कॉलनीत भाड्याने राहत आहे. साधारण वर्षभरापूर्वी अमित यांचे लग्न झाले होते. मात्र लग्न झाल्यापासून त्याची पत्नी बहुतेक वेळा तिच्या माहेरच्या घरी राहते. आताही गेल्या ६ महिन्यांपासून ती तिच्या आई-वडिलांच्या घरी राहत होती. अमितने तिला अनेकवेळा घरी परत आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, हट्टापायी ती माहेरीच राहात होती. पंचायत आणि मध्यस्थ यांच्यामार्फत तिला परत आणण्याचे प्रयत्न केले, पण ती आली नाही. यामुळे नाराज होऊन अमितने हे पाऊल उचलले आहे. पत्नी आपल्यापासून वेगळी राहात असल्याचे त्याला सहन होत नव्हते. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

दिराने केले विधवा वहिनीसोबत लग्न अन् नको ते घडलं…

नवविवाहितेला नको त्या अवस्थेत सासूने पाहिले अन् बसला धक्का; युवक निघाला…

युवती झाडू काम करून उपजिल्हाधिकारी झाली अन् आता अटक…

नवऱ्यासोबत मैत्रिणीला रंगेहात पकडल्यावर मैत्रिणीला गेटला बांधले अन्…

हृदयद्रावक! लग्नानंतर चौथ्याच दिवशी नवरदेवाचा मृत्यू…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!