दीर आणि वहिनी झाडाखाली थांबले-थांबले अन् पुढे…

रांची (छत्तीसगड): कोरबा जिल्ह्यातल्या पसान पोलीस ठाण्याच्या क्षेत्रातल्या उदरदा गावात दीर आणि वहिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोघांचे मृतदेह झाडाला लटकत असल्याचे दिसल्यानंतर गावात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

एक पुरुष आणि एक स्त्री अशा दोघांचे मृतदेह एका झाडावर लटकत असल्याचे पाहिल्यानंतर ग्रामस्थांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी दोन्ही मृतदेह झाडावरून खाली उतरवले आणि शवविच्छेदनासाठी पाठवले. दोघांच्या आत्महत्येचे कारण पुढे आले नसून, पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

आत्महत्या केलेले दीर आणि वहिनीला प्रत्येकी तीन मुलंही होती. मृत महिलेचा पती मोलमजुरीची कामं आणि शेती करतो. तो सकाळी उठला, तेव्हा त्याला घरात पत्नी दिसली नाही; मात्र त्याने विचार केला, की काही तरी कामाला बाहेर गेली असेल; मात्र थोड्या वेळाने त्याला बातमी समजली, की त्याची पत्नी आणि त्याच्या भावाने गळफास लावून घेऊन आत्महत्या केली आहे. त्या दोघांचेही मृतदेह झाडाला लटकत आहेत. याबाबातची माहिती कळताच महिलेच्या पतीला मोठा धक्का बसला आहे.

दिराच्या प्रेमात अक्षरशः वेडी झाली वहिनी अन् पुढे तर…

दीर आणि वहिनीच्या हातात नको त्या कृत्यामुळे पडल्या बेड्या…

हृदयद्रावक! वहिनीचे दिरासोबत प्रेमसंबंध; तीन चिमुकले अन् पोलिस…

वहिनी पहाटेच्या सुमारास भांडी घासत असताना दिर जवळ गेला अन्…

नात्याचा शेवट! अल्पवयीन दीर आणि वहिनीला रंगेहाथ पडकले…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!