वरळी हिट अ‍ॅण्ड रन प्रकरण! दोन किमी फरफटत नेले अन् घेतला महिलेचा जीव…

मुंबईः वरळीत असलेल्या प्रसिद्ध अॅट्रिया मॉलजवळ हिट अँड रनची घटना घडली आहे. कावेरी नाखवा यांना गाडीने धडक देऊन दोन किलोमीटर लांब अंतरापर्यंत फरफटत नेले. ज्यामुळे त्या गंभीर जखमी झाल्या. नायर रुग्णालयात नेल्यानंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले. वरळीतील रहिवासी आणि नातेवाईकांनी याप्रकरणी संताप व्यक्त केला असून, पोलिसांनी दोघांना अटक केली आहे.

अॅट्रिया मॉलजवळच असणाऱ्या वरळी कोळीवाडा परिसरात राहणारे कावेरी आणि प्रदीप नाकवा हे कोळी दाम्पत्य सकाळी माशांच्या लिलावासाठी ससून डॉकला जाण्यासाठी घराबाहेर पडले होते. मासे घेऊन दुचाकीवरुन परतत असताना दाम्पत्याच्या दुचाकीला एका चारचाकी गाडीने धडक दिली. धडक दिल्यानंतरही चारचाकी गाडीच्या चालकाने गाडी न थांबवता तशीच पळवली. त्यात त्यानं बोनेटवर पडलेल्या कावेरी नाकवा यांना फरफटत नेलं. या अपघातात प्रदीप नाकवा हे थोडक्यात बचावले. मात्र, कावेरी या गंभीर जखमी झाल्या होत्या. त्यानंतर कावेरी यांना तात्काळ मुंबई सेंट्रल येथील नायर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत फार उशीर झाला होता. डॉक्टरांनी कावेरी नाकवा यांना मृत घोषित केले.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

या प्रकरणात आरोपी असलेल्या मिहीर शाह हा फरार असून त्याचे वडील हे राजेश शाह हे शिवसेना शिंदे गटाचे उपनेते आहेत. राजेश शाह यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून मिहीरचा शोध सुरू आहे. या प्रकरणात मिहीर सोबत असलेल्या ड्रायव्हरला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरू आहे.

दरम्यान, वरळी हिट ॲण्ड रन प्रकरणात मिहिर शहासोबत त्याचा चालक राजरुपी राजेंद्र सिंग बिडावत क्रॉफर्ड मार्केट येथून मरीनड्राइव्हहून वरळीसाठी पेडररोड मार्गे आला. नेहरू तारांगण येथील बसस्टॅापच्या विरूद्ध दिशेला असलेल्या पुनम चेंबर इमारीच्या जवळ पहाटे 5:15 वाजता हा अपघात झाला. प्रदीप नाखवा आणि मृत्युमुखी पडलेल्या कावेरी नाखवा ह्या वरळीतील रहिवासी होते. त्यांचा मच्छीचा व्यवसाय होता. सकाळी 5:15 दरम्यान ते सीएसटीवरून मच्छी घेऊन येत असताना शहा यांच्या भरधाव बीएमडब्यु गाडीने धडक दिली.

पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

बीएमडबल्यू चालक मिहीर शाह यांचे वडील शिवसेनेच्या शिंदे गटातील राजेश शाह पालघरमधील शिवसेनेचे उपनेते आहेत. वरळी हिट अॅण्ड रन प्रकरणात त्यांचा मुलगा आणि ड्रायव्हर गाडीत होता. याप्रकरणी सर्वप्रथम राजेश शाह यांना गाडी मालक म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले. वरळीच्या पोलिसांनी बीएमडबल्यू गाडी बोरिवली मधुन ताब्यात घेतली. त्यानंतर वरळी पोलीस स्टेशनमध्ये फॅारेन्सिक तपासणी केली गेली. या गाडीच्या काचेवर बाळासाहेबांच्या शिवसेनेचे 2 पक्षचिन्ह चिकटवले होते. अपघातानंतर ते मिटवण्यासाठी प्रयत्न केले गेले. गाडीची नंबर प्लेट देखील काढण्यात आली.

वरळी हिट अ‍ॅण्ड रन प्रकरणातला आरोपी मिहीर शाह याचे वडील राजेश शाह आणि त्याच्यासोबत असलेल्या राजेंद्रसिंग बिडावत यांना पोलिसांनी अटक केली आहे. दिवसभराच्या चौकशीनंतर अखेर दोघांना अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार दोघांवरही गुन्हे दाखल करुन अटक करण्यात आली. या अपघातानंतर आरोपी मिहीर शाह फरार आहे.

वरळी हिट अँड रनच्या घटनेनंतर महाराष्ट्र राज्य उत्पादन शुल्क विभाग ॲक्शन मोडमध्ये आले आहे. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दोन टीम बारमध्ये सध्या माहिती घेऊन कारवाई करत आहे. बारमध्ये महाराष्ट्र शासनाच्या सर्व नियमाचे पालन केलं जात होतं का आणि हा बार रात्री उशिरापर्यंत चालू होता का? या संदर्भात देखील माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून घेतली जात आहे.

भीषण अपघात! आमदाराच्या पुतण्याने दुचाकीस्वाराला चिरडलं; आमदार म्हणतात…

पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीने लिहिलेला निबंध आला समोर…

नागपूरमध्ये भरधाव कारने फुटपाथवर झोपलेल्या 9 मजुरांना चिरडलं…

नशिब बलवत्तर! पिंपरी-चिंचवडमध्ये अपघाताचा धक्कादायक Video समोर…

क्लास वन अधिकारी अन् सासऱ्याची सुपारी; कसा उलगडा झाला पाहा…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!