हनिमूनसाठी निघालेल्या पतीला झोपेतून उठल्यावर बसला धक्का…

पाटणा (बिहार): विवाह सोहळा मोठ्या उत्साहात पार पडल्यानंतर पती-पत्नी हनिमूनसाठी निघाले होते. पण, प्रवासादरम्यान नवरी बेपत्ता झाल्यामुळे खळबळ उडाली आहे. याबाबत तक्रार दाखल झाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, नवविवाहित दांपत्य दिल्लीवरून न्यू जलपैगुडी येथे हनिमूनसाठी निघाले होते. आनंद विहार स्टेशनवरून निघालेल्या या ट्रेनमध्ये मुझफ्फरपूर स्टेशन येथून प्रवासासाठी निघाले होते. पण, प्रवासादरम्यान नवरी काजल (वय २३) बेपत्ता झाली. तिचा पती प्रिंस कुमार हिने रेल्वेमध्ये तिचा शोध घेतला. पण, सापडली नाही. अखेर, त्याने किशनगंज जीआरपी पोलिस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली आहे.

पोलिस ठाण्याचे प्रमुख नितेश कुमार यांनी सांगितले की, प्रिंस कुमार हात त्याची पत्नी काजल हिच्यासोबत न्यू जलपैगुडी येथे रेल्वेने जात होती. पती आपल्या सिटवर झोपला. किशनगंजजवळ पत्नी तिच्या बर्थवर न दिसल्याने त्याने इतर प्रवाशांकडे चौकशी केली. पण, आढळून आली नाही. यानंतर पतीने पोलिस ठाण्यात येऊन तक्रार दाखल केली आहे. काजलचा तपास सुरू केल्यावर मोबाईलचा सीडीआर रिपोर्ट तपासला. तपासादरम्यान, तिचा मोबाईल स्विच ऑफ असल्याचे दिसून आले. मोबाईलचे शेवटचे लोकेशन हे समस्तीपूर असल्याचे सांगण्यात येत आहे. कॉल डिटेलच्या आधारावर पुढील तपास केला जात आहे.

हनीमूनच्या दुसऱ्याच दुसऱ्याच दिवशी नवरीने दिला बाळ जन्म…

प्रेम! मामीने ठोकली भाच्यासोबत धूम अन् पुढे…

वहिनीने अनैतीक संबधातून केली दीराची हत्या अन् म्हणाली नवरा नामर्द…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!