पत्नीने रात्रीच्या वेळी दूध उकळून त्यात विष मिसळले अन् पुढे…

जयपूर (राजस्थान) : एका जोडप्याने आपल्या तीन मुलांसह आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. सुदैवानं मुलांनी विषारी दूध पिण्यास नकार दिला. जोडप्यानं हे दूध प्यायल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली. मात्र वेळेत रुग्णालयात दाखल केल्याने या जोडप्याचे प्राण वाचले आहेत.

अजमेर मधील कल्याणीपुरा भागात राहणाऱ्या एका जोडप्याने अनेक लोकांकडून पैसे उधार घेतले होते. पतीने व्यवसायासाठी कर्ज घेतले होते. पण व्यवसाय चालला नाही आणि पैसे बुडाले. त्यानंतर कर्ज देणाऱ्या व्यक्तींनी सातत्याने पैशासाठी तगादा लावला. कर्ज देणाऱ्यांच्या धमक्यांना कंटाळून जोडप्यानं हे टोकाचं पाऊल उचलल्याची माहिती पोलिस तपासादरम्यान पुढे आली आहे.

कर्जाला कंटाळलेल्या कुटुंबियांनी आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला. रात्रीच्या वेळी महिलेनं दूध उकळून त्यात विष मिसळले. त्यानंतर ते पती आणि मुलांना प्यायला दिले. थोड्या वेळाने महिलेनं देखील दूध प्यायली. महिलेने जेव्हा मुलांना दूध पिण्यास दिलं, तेव्हा त्यांनी दूध पिण्यास नकार दिला. पण पती-पत्नीनं दूध घेतले. दूध प्यायल्यानंतर काही वेळाने त्यांची प्रकृती बिघडू लागली. मुलांनी याबाबतची माहिती शेजाऱ्यांना दिली. त्यानंतर दोघांना रुग्णालयात दाखल केलं. आता या जोडप्याच्या प्रकृती धोक्याबाहेर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

वहिनी पहाटेच्या सुमारास भांडी घासत असताना दिर जवळ गेला अन्…

प्रेमप्रकरणातून मुलीने तोडले आईचे बोट अन् आईने केली मुलीची हत्या…

धक्कादायक! डॉक्टरने ब्लेडने चिरला मुलीचा गळा अन् पुढे…

महिलेने दाताने तोडला युवकाचा कान अन् गिळला सुद्धा…

मित्राने गुप्तांगावर हाताचा कोपरा मारला अन् गेला जीव…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!