एका OYO हॉटेलमध्ये बहिण गेल्याचे समजताच भाऊ गेला अन्…

नवी दिल्ली : एक युवक अल्पवयीन युवतीला हॉटेलमध्ये घेऊन गेल्याची माहिती युवतीच्या भावाला समजताच त्याने पोलिसांत तक्रार केली. पोलिसांनी युवकाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि ओयो हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आणि त्याची रवानगी तुरुंगात करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, ‘आरोपीला अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाच्या आदेशानुसार त्याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली आहे.’

दिल्लीतील संगम विहार येथील रहिवासी असलेल्या पीडितेच्या भावाने पोलिसांना सांगितले की, `सध्या मी कुटुंबासह सेक्टर -123 येथील एका भाडेतत्त्वावरील घरात राहतो. माझी 16 वर्षांची बहीण ट्रान्सपोर्टनगर येथील एका कंपनीत सफाईचे काम करते. त्याच कंपनीत एजाज नावाचा युवक काम करतो. 17 नोव्हेंबरला बहीण घरी आली नाही. तिचा शोध घेतला असता ती सेक्टर-66 येथील एका ओयो हॉटेलमध्ये असल्याची माहिती मिळाली. मी तिथं पोहोचलो आणि एजाजला रंगेहाथ पकडले. आरोपीनं माझ्यावर बलात्कार केल्याचा जबाब युवतीने दिला आहे.’

धक्कादायक! प्रियकराने प्रेयसीला OYO रूमवर बोलावले अन् पुढे…

पिंपरी-चिंचवड हादरलं! प्रेयसीला लॉजवर घेऊन गेला अन्…

धक्कादायक! शरीर संबंधानंतर रक्तस्त्राव झाल्याने प्रेयसीचा मृत्यू; अन् प्रियकर…

Video: पती-पत्नी आणि प्रेयसीचा भररस्त्यात गोंधळ…

हॉटेलमधून महिला आणि प्रियकर हातात हात घालून बाहेर पडले अन् समोर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!