जम्मू-काश्मीरमध्ये चकमकीत कर्नल, मेजर, पोलीस अधिकारी आणि श्वान हुतात्मा…

श्रीनगर : जम्मू-काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातल्या कोकेरनाग भागामध्ये लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत लष्कराचे कर्नल, मेजर, जम्मू-काश्मीरचे पोलीस उपाधिक्षक आणि केंट नावाचा श्वान हुतात्मा झाला आहे. कर्नल मनप्रीत सिंग, मेजर आशिष धोनॅक आणि जम्मू काश्मीरचे पोलील उपाधिक्षक हुमायून भट अशी हुतात्मा झालेल्यांची नावे आहेत.

गाडोले भागात लपलेल्या दहशतवाद्यांमध्ये आणि सुरक्षा बलामध्ये जोरदार चकमक सुरू झाली होती. दहशतवादी आणि सुरक्षा बलामध्ये सुरू झालेल्या गोळीबारामध्ये कर्नल आणि पोलीस अधिकारी गंभीररित्या जखमी झाले होते. प्रतिबंधित दहशतवादी संघटना लष्कर ए तौयबाशी जोडल्या गेलेल्या रेजिस्टेन्स फ्रंटने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.

सैन्य दलाकडून सर्च ऑपरेशन राबवलं जात आहे. या परिसरात लपून बसलेल्या दहशतवाद्यांना शोधण्यासाठी शोधमोहिम राबवली जात आहे. काश्मीरच्या राजौरी भागात सैन्य दल आणि दहशतवादी यांच्यात चकमक झाली. यादरम्यान, सैन्य दलाच्या श्वानाचाही मृत्यू झाला आहे. राजौरी भागात झालेल्या चकमकीत श्वानाला गोळी लागली होती.

जम्मू आणि काश्मीरमधील राजौरी येथे सुरक्षा दलांच्या तुकडीचे नेतृत्व करताना गोळी लागल्याने आर्मी डॉग युनिटचा एक भाग असलेल्या केंट नावाच्या श्वानाचा मृत्यू झाला. 12 सप्टेंबर रोजी, राजौरीमध्ये लष्कराचे जवान आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या गोळीबारात भारतीय लष्कराच्या 21 आर्मी डॉग युनिटमधील केंटचा मृत्यू झाला. केंट या सहा वर्षीय मादी लॅब्राडोरचा गोळी लागल्याने मृत्यू झाला. तिरंग्यामध्ये लपेटून भारतीय लष्कराने केंट या कुत्र्याला अखेरचा निरोप दिला.

लष्करी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (ता. १२) जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यातील एका दुर्गम गावात छापा टाकण्यासाठी गेलेल्या सुरक्षा दलाच्या पथकावर दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यावेळी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. सैन्य दलाने एका दहशतवाद्याला ठार केले आहे. यावेळी दहशतवाद्यांनी पोलीस आणि लष्कराला चकवा देत पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, सैन्य दलाने दहशतवाद्यांचा पाठलाग केला. यावेळी लष्कराच्या पथकामध्ये केंट हा श्वान देखील होता. केंटने माग काढत लष्कराला दहशतवाद्यांना शोधण्यात मदत केली.

यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार करण्यास सुरुवात केली. प्रत्युत्तरादाखल सैन्य दलानेही गोळीबार केला. मात्र, दहशतवाद्यांकडून गोळीबार सुरु असताना एक गोळी केंटला लागली. या चकमकीत लष्कराचा एक जवान हुतात्मा झाला, तर सुरक्षा दलाने तीन हशतवाद्यांना कंठस्नान घातले. मात्र, 21 आर्मी डॉग युनिटमध्ये समाविष्ट असलेल्या केंट नावाच्या भारतीय लष्कराच्या श्वानाचाही मृत्यू झाला आहे.

जवानाने आठ महिन्यांच्या गरोदर पत्नीची आणि चिमुकलीची केली हत्या…

कौतुकाचा वर्षाव! जवानाचा Video पाहून पाणावतील डोळे…

Video: जवानाने प्रवाशाचा जीव वाचवण्यासाठी लावली जीवाची बाजी…

जम्मू-काश्मीरमध्ये नदी ओलांडताना दोन जवान गेले वाहून…

महाराष्ट्राचा सुपुत्र आकाश अढागळे लेहमध्ये हुतात्मा…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!