55 वर्षाच्या महिलेचे युवकासोबत प्रेमसंबंध अन् नवऱ्याचा बळी…

लखनौ (उत्तर प्रदेश) : पत्नीने प्रियकरासाठी 60 वर्षीय पतीला कुऱ्हाडीने तोडून हत्या केल्याची धक्कादायक घटना पिलीभीतमध्ये घडली होती. पोलिसांनी गुन्ह्याचा शोध लावून पत्नीला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी हत्या प्रकरणातील आरोपी पत्नी दुलारो देवी हिला अटक केली आहे. गजरौला परिसरातील शिवनगर गावात राहणाऱ्यारामपालची पत्नी दुलारो देवी (वय ६०) हिने 24 जुलै रोजी रात्री कुऱ्हाडीने वार करून पतीची हत्या केली होती. शिवाय, मुलांची आणि नातेवाईकांची दिशाभूल करण्यासाठी तिने पती बेपत्ता झाल्याची माहिती दिली होती.

पोलिसांनी दुलारो देवीची कडक चौकशी केली असता तिने सांगितले की, रामपालसोबत रोज भांडण होत असे. 24 जुलै रोजी मुलगा गावातील दुसऱ्या घरात झोपलेला होता. खाटेवर झोपलेल्या पतीचा कुऱ्हाडीने वार करून खून केला. त्यानंतर कुऱ्हाडीने मृतदेहाचे तुकडे करून गोणीत भरून निगोही ब्रांच कालव्यात फेकून दिले.

दरम्यान, शुक्रवारी सकाळी दियोरियाजवळील कालव्यात दोन पोती सापडली होती. पोलिसांनी सांगितले की, ‘दुलारो देवी बरेलीच्या नरियावाल येथे एका कारखान्यात काम करत होती. यादरम्यान तिचे रिठोरा येथील एका युवकासोबत प्रेमसंबंध सुरू झाले. दोघे रिठोरा येथील एका घरात वेगवेगळ्या खोलीत राहत होते. युवकासोबत असलेल्या संबंधांमुळे दुलारोचा पती रामपाल याच्याशी वाद होत होता. दुलारो हिने पती रामपालची हत्या केल्यानंतर तिने रक्ताळलेली कुऱ्हाड स्वच्छ करून कपाटात ठेवली होती. शिवाय, घराची फरशीही धुतली होती.

दुलारो हिचा लहान मुलगा सोमपालने सांगितले की, ‘त्याला दोन भाऊ, चार बहिणी आहेत. सर्वात मोठी बहीण सुमारे 32 वर्षांची आहे. सहा महिन्यांपूर्वी दुलारो देवीचे एका युवकासोबत संबंध असल्याचे कुटुंबीयांना समजले, तेव्हापासून संपूर्ण कुटुंब तिच्या विरोधात गेले होते. दुलारोचे वय 55 वर्षे आणि तिच्या प्रियकराचे वय 32-33 वर्षे आहे.’

धक्कादायक! प्रेमसंबंधातून नवऱ्यासह तीन मुलांची हत्या…

लॉकडाऊनमधील प्रेमसंबंधाचा तिहेरी खुनाने झाला शेवट अन्…

प्रेमसंबंधात अडथळा! पुणे शहरात वेबसिरिज पाहून केला खून अन् मृतदेह…

प्रेमसंबंधातूनच अंजलीची हत्या; प्रियकराने तपासादरम्यान सांगितले…

माता न तू वैरिणी! अनैतिक प्रेमसंबंधात अडथळा म्हणून चिमुकल्याचा खून…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!