‘रन फॉर दि-ऍडिक्शन ऍण्ड रन फॉर वुमन सेफ्टी’ मॅरेथॉनचे आयोजन…
पुणे (संदीप कद्रे): ‘रन फॉर दि-ऍडिक्शन ऍण्ड रन फॉर वुमन सेफ्टी’ मॅरेथॉनचे आयोजन रविवारी (ता. ६) करण्यात आले आहे. सदर मॅरेथॉन सहभाग घेण्यासाठी हॉटेल वेस्टीन या ठिकाणी ०६ / ०८ / २०२३ रोजी सकाळी ०५.३० वा. उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शासनाचे उपक्रमांतर्गत अंमली पदार्थ व्यसनमुक्ती : दि – ऍडिक्शन ऍण्ड वुमन सेफ्टी (महिला सुरक्षा) अनुषंगाने समाजामध्ये जनजागृती करणे करीता पोलिस आयुक्त रितेश कुमार यांनी मॅरेथॉन आयोजित करणे बाबत सुचना दिल्या होत्या. त्यानुसार अपर पोलिस आयुक्त, पूर्व प्रादेशिक विभाग, पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली पुणे शहर पोलिस दलाचे वतीने पुणे पोलिस व नागरीकांकरीता ब्ल्यु ब्रिगेड रनिंग क्लब, पुणे यांचे सहकार्याने ०६/०८/२०२३ रोजी सकाळी ०५.३० वा. ‘रन फॉर दि- ऍडिक्शन ऍण्ड रन फॉर वुमन सेफ्टी’ मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर कार्यक्रमाचा सकाळी ०९.०० वा. पुर्वी समरोप होईल. मॅरेथॉन मधील सहभागी पोलिस व नागरीक स्पर्धक यांनी त्यांचे टी-शर्ट व बिब नंबर हे ०५/०८/२०२३ रोजी सकाळी ११.०० ते सायं. ०५.०० वा. या वेळेत हॉटेल वेस्टीन (लॉबी), कोरेगाव पार्क, एबीसी रोड, मुंढवा, पुणे येथून प्राप्त करुन घ्यावेत.
सदर मॅरेथॉन स्पर्धेची वेस्टीन हॉटेल, एबीसी रोड, कोरेगावपार्क, मुंढवा, पुणे येथून सुरूवात होऊन हडपसर, मगरपट्टा सिटी येथुन पुन्हा वेस्टीन हॉटेल येथे समारोप होईल. सदरचे रजिस्ट्रेशन मोफत ठेवण्यात आले होते. सहभागी स्पर्धक यांना मोफत नाष्टा, टि-शर्ट, मेडेल दिले जाणार आहे. रन फॉर डि- ऍडिक्शन ऍण्ड रन फॉर ऊमन सेफ्टी मॅरेथॉनमध्ये पोलिस व नागरिक असे ६५० ते ७०० स्पर्धेक धावणार आहेत. तरी, सर्व सहभागी नागरीकांना सुचित करण्यात येते की, सदर मॅरेथॉन सहभाग घेण्यासाठी हॉटेल वेस्टीन या ठिकाणी ०६ / ०८ / २०२३ रोजी सकाळी ०५.३० वा. उपस्थित रहावे.
पुणे विमानतळावर वृद्ध महिलेने बॉम्ब अफवा पसरवून उडवली धावपळ…
कारच्या काचेवर धमकीची चिठ्ठी चिटकून खंडणी मागणाऱ्यास Unit-2ने केले जेरबंद…
वादग्रस्त वक्तव्य! पुणे शहरातील कॉलेजचा प्राध्यापक निलंबित; गुन्हा दाखल…
पुणे दहशतवादी प्रकरण : भूलतज्ञ डॉक्टर युवकांना ओढायचा ISISच्या जाळ्यात अन्…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…