कौतुकाचा वर्षाव! जवानाचा Video पाहून पाणावतील डोळे…
नवी दिल्ली: भारतीय लष्करात सेवा करणारा जवान घरी आल्यानंतर कुटुंबियांनी रेड कार्पेट टाकून आपल्या लाडक्या लेकाचे स्वागत केल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच घरी परतलेल्या आपल्या लेकाच्या स्वागतासाठी घरच्यांची लगबग आणि त्यांनी केलेलं स्वागत पाहून अनेकांची डोळे पाणावले आहेत. शौर्यचक्र पुरस्काराने सन्मानीत करण्यात आलेले पवन कुमार मेजर जनरल (निवृत्त) यांनी हा […]
अधिक वाचा...पिंपरी-चिंचवडमधील पोलिसकाकांचे अपघाती निधन…
पुणेः पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकात कार्यरत असलेले पोलिस अंमलदार राजेश कौशल्य यांचे अपघाती निधन झाले. एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत 2 ऑगस्ट रोजी खंडेवस्ती, स्पाईन रोड येथे त्यांचा अपघात झाला होता. उपचारादरम्यान आज (सोमवार) (दि. 14) त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युमुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिस अंमलदार राजेश कौशल्य यांनी […]
अधिक वाचा...लातूरमध्ये भीषण अपघातात न्यायाधीशांचा जागीच मृत्यू…
लातूर : लातूर जिल्ह्यातील रेणापूर-उदगीर मार्गावर शुक्रवारी (ता. ११) मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात न्यायाधीशांसह त्यांच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. उद्धव वसंत पाटील असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या न्यायाधीशांचे नाव आहे. ते बीडच्या सेशन कोर्टाचे न्यायाधीश होते. त्यांच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव ट्रकने चारचाकीला धडक दिल्याने हा […]
अधिक वाचा...धुळे जिल्ह्यात दोन गटात राडा; दगडफेकीत 15 पोलिसांसह स्थानिक जखमी…
धुळे : धुळे जिल्ह्यातील सांगवी (शिरपूर) येथे गुरुवारी (ता. 10) सायंकाळच्या सुमारास बॅनर फाडण्यावरुन दोन गटात वाद निर्माण झाला. दोन्ही गटाकडून एकमेकांवर दगडफेक करण्यात आली. या दगडफेकीत 15 पोलिस कर्मचारी आणि तीन ते चार स्थानिक नागिरक किरकोळ जखमी झाले आहेत. या प्रकरणी 150 ते 200 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिसांनी 13 जणांना अटक […]
अधिक वाचा...पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याबरोबरच बॉम्ब स्फोटची धमकी…
पुणे: एका अज्ञात व्यक्तीकडून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी अलंकार पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. भारतात विविध ठिकाणी बॉम्ब ब्लास्ट घडवून आणण्याबरोबरच पंतप्रधान नरेंद्र मोदींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी आली आहे. पुण्यातील एका व्यक्तीला विदेशातून एक ईमेल आला. त्यामध्ये मी भारतामध्ये सिरीयल […]
अधिक वाचा...इंदुरीकर महाराज यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका…
नवी दिल्लीः प्रसिद्ध कीर्तनकार हभप निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिलेला निकाल कायम ठेवत सर्वोच्च न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली आहे. त्यामुळे आता इंदुरीकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. इंदुरीकर महाराज यांनी पुत्र प्राप्तीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्या प्रकरणात प्रथम वर्ग न्यायाधीशांचा निकाल औरंगाबाद खंडपीठाने कायम ठेवला होता. […]
अधिक वाचा...पुणे दहशतवादी अटक प्रकरणात मोठी घडामोड; वाहनात आढळला शस्त्रसाठा…
पुणे : महाराष्ट्र एटीएसने दहशतवादाचा मोठा कट उधळला असून, पुण्यामधील दहशतवादी कारवाईला आळा घालण्यात एटीएसला यश आले आहे. पुणे कोंढवा परिसरात राहणारे ISIS या दहशतवादी संघटनेचे मॉड्युल महाराष्ट्र दहशतवादी विरोधी पथकाकडून उध्वस्त करण्यात आला आहे. महाराष्ट्र एटीएसने दहशदवादी संघटनेशी संबंधित अटक आरोपीकडून एक चारचाकी वाहन आणि दोन अग्निशस्त्रे तसेच पाच जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत. […]
अधिक वाचा...नितीन देसाई यांच्या पत्नीने केले गंभीर आरोप; तक्रारीत म्हटले की…
मुंबई : ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई यांच्या आत्महत्या प्रकरणी त्यांची पत्नी नेहा यांनी फायनान्स कंपनी एडलवाईस विरोधात तक्रार दाखल केली आहे. फायनान्स कंपनीसह अधिकाऱ्यांनी कर्जाच्या वसुलीसाठी दबाव टाकल्यामुळे नितीन देसाई यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली आहे, असा आरोप नेहा देसाई यांनी तक्रारीत केला आहे. तर या प्रकरणी एडलवाईस कंपनीने स्पष्टीकरण दिले आहे. फायनान्स कंपनीने […]
अधिक वाचा...नितीन देसाई यांच्या आत्महत्येची मित्राने सांगितली कहाणी; अहवाल समोर…
मुंबई: प्रख्यात कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (५७) यांनी त्यांच्या कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये बुधवारी (ता. २) पहाटे गळफास घेऊन आत्महत्या केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. नितीन देसाई यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन जे जे रुग्णालयात करण्यात आले. प्राथमिक निष्कर्षानुसार मृत्यूचे कारण फाशीमुळे झाल्याचे रायगड पोलिसांनी सांगितले. एनडी स्टुडिओतच त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार […]
अधिक वाचा...मोठी बातमी! सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई यांची आत्महत्या…
मुंबई: हिंदी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध कलादिग्दर्शक नितीन चंद्रकांत देसाई (वय ५८) यांनी कर्जत येथील एनडी स्टुडिओमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनेक हिंदी चित्रपट आणि अनेक मोठ्या कार्यक्रमांसाठी भव्य सेट उभारणारे कलादिग्दर्शक म्हणून त्यांची ख्याती होती. त्यांच्या आत्महत्येने हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. नितिन देसाई […]
अधिक वाचा...
