Video: सहकारनगर पोलिसांनी चोरट्याला केले जेरबंद; घरात घुसून त्याने…

पुणे (संदिप कद्रे): इस्टेट एजंट असल्याचे भासवुन प्रॉपर्टी विकत घेण्याचे बहाण्याने घरात घुसून दागिणे व मोबाईल फोन चोरणाऱ्या चोरट्याला सहकारनगर पोलिसांनी जेरबंद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत.

सुमीत चव्हाण (रा. सहकारनगर नं. १ पुणे) यांना १३/०२/२०२४ रोजी एकाने तुमचे घर विकत घेण्यासाठी माझ्याकडे पार्टी असुन त्यांना घर पाहण्यासाठी घेवून येत असल्याचे सांगितले. त्यावेळी त्यांना दुपारी १२.३० वा. ची वेळ दिली व कामासाठी निघून गेले होते. काम आवरून साधारण दुपारी ०१.३० वा. चे सुमारास घरी आले असता खोलीत टेबलवर ठेवलेला दुसरा अॅपल कंपनीचा आयफोन मोबाईल फोन घेण्यासाठी गेले असता त्यांना मोबाईल फोन मिळुन आला नाही. त्यावेळी त्यांनी त्यांचे आईला मोबाईल मिळुन येत नाही असे विचारले त्यावेळी आईने एक इसम ११.३० वा. चे सुमारास घरी आला होता. तो माझ्या शेजारी बसला व घर पाहुन येतो असे म्हणून आतील खोलीत गेला होता असे फिर्यादी यांना त्यांचे आईने सांगितले. त्यावेळी त्यांना आईच्या गळयात तीचे सोन्याचे मंगळसुत्र दिसले नाही त्याबाबत तिला विचारले असता तीने उशीखाली ठेवले होते असे सांगितले. आईच्या उशाला ठेवलेले तीचे सोन्याचे मंगळसुत्र व आयफोन कंपनीचा मोबाईल फोन चोरून नेल्याची खात्री झाल्याने त्याबाबत सहकारनगर पोलिस ठाणे येथे गुरनं ६२ / २० कलम ३८० प्रमाणे गुन्हा दाखल केला होता.

सदर गुन्हयाचे तपासाचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे सहकारनगर पोलिस स्टेशन यांनी मार्गदर्शन व सुचना देवन तपास पथकातील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार यांना आदेश केल्याने सदर गुन्हयाचे अनुषंगाने वेगवेगळ्या भागातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले त्यावरून पोलिस अंमलदार अमोल पवार व विशाल वाघ यांनी बातमीदारामार्फत बातमी मिळवली की सदर सोन्याचे मंगळसुत्र व आयफोन कंपनीचा मोबाईल फोन चोरनारा हा उरुळी कांचन पुणे भागात आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाल्याने पोलिस अंमलदार सागर सुतकर यांनी तांत्रिक विश्लेशन करून सदर आरोपीचे ठावठिकाणा बाबत माहिती मिळवून सदर माहिती सहकारनगर पोलिस स्टेशन कडील वरिष्ठांना कळविली. त्यांनी लागलीच पोलिस अंमलदार यांची टीम तयार करुन त्यांना सुचना व मार्गदर्शन करून बातमीचे ठिकाणी जावुन कारवाई करण्याचे तोंडी आदेश दिले त्यानुसार सहकारनगर पोलिस स्टेशन तपास पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी बातमीचे ठिकाणी जावुन छापा टाकला. अनिल ज्ञानेश्वर मलठणकर (वय ५८ वर्षे रा. चाळ नं. २३ घ नं. १७७, आंबेडकर शाळेसमोर, लक्ष्मीनगर पर्वती पुणे) असे त्याचे नाव आहे.

पोलिसांनी त्याची झडती घेता त्याचे ताब्यातुन १०,०००/-रुपये किंमतीचा एक अॅप्पल कंपनीचा आयफोन ७ मॉडेलचा मोबाईल फोन व ३६,०००/-रु किंमतीचे एक सोन्याचे मंगळसुत्र असा एकुण ४६,००० /-रुकिंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. त्याच्याकडे सहकारनगर पोलिस ठाणे येथील गुरनं ६२/२०२४ भा.द.वि. कलम ३८० सदरचा गुन्हा उघड करण्यात आला आहे. सदर आरोपीने अशा प्रकारचे आणखी काही गुन्हे केले आहेत काय? त्याबाबत वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे सहकारनगर पोलिस स्टेशन हे अधिक तपास करीत आहेत.

सदरची कामगीरी अपर पोलिस आयुक्त सो पश्चिम प्रादेशीक विभाग प्रविणकुमार पाटील, पोलिस उपायुक्त परिमंडळ-२, स्मार्तना पाटील, सहा. पोलिस आयुक्त, स्वारगेट विभाग नंदिनी वग्यानी, वरिष्ठ पोलिस निरीक्षक सुरेंद्र माळाळे यांचे मार्गदर्शनाखाली सहकारनगर पोलिस स्टेशन तपास पथकाचे सहा पोउपनिरी बापु खुटवड, पोलिस अंमलदार अमोल पवार, विशाल वाघ, सागर सुतकर, बजरंग पवार, किरण कांबळे, महेश मंडलिक, निलेश शिवतारे, नवनाथ शिंद, सागर कुंभार, संजय गायकवाड, यांनी केली आहे.

सहकारनगर पोलिसांनी पीएमटीमध्ये चोरी करणाऱ्यास शिताफीने केली अटक…

सहकारनगर पोलिसांनी नायलॉन मांजाची विक्री करणाऱ्याला केले जेरबंद…

सहकारनगर पोलिसांनी दोन सराईत गुंडांना केले जेरबंद…

पुणे शहरातील पब, बार, हॉटेल्स पूर्वीप्रमाणेच सुरू राहणार; पाहा नियमावली…

जेनिफर अँड द बीस्ट पुस्तकाचे प्रकाशन! पोलिसांनी लेखनातून व्यक्त व्हावे: अशोक धिवरे

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!