पुणे! बिबवेवाडी पोलिसांनी बेकायदेशीर देशी कट्टा बाळगणाऱ्यास केले जेरबंद…

पुणे (संदिप कद्रे): बेकायदेशीर ०१ देशी गावठी कट्टा (अग्निशस्त्र ) व ०१ जिवंत काडतुस जवळ बाळगणाऱ्या आरोपीस बिबवेवाडी पोलिसांनी जेरबंद केले आहे. प्रथमेश सुरेश पवार (वय १९, रा. बिबवेवाडी, पुणे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

बिबवेवाडी पोलिस ठाण्याचे तपास पथक ०४ ऑक्टोबर २०२५ रोजी परिसरात अतिमहत्त्वाच्या व्यक्तींच्या पुणे भेटीच्या पार्श्वभूमीवर पेट्रोलिंग करत होते. पोलिस अमंलदार सुमित ताकपेरे, आशिष गायकवाड आणि शिवाजी येवले यांना गुप्त बातमी मिळाली की “टेंभेकर मळा, अण्णाभाऊ साठे सभागृहाजवळील शेतकरी हॉटेलच्या पलीकडील मोकळ्या जागेत एक इसम लोखंडी अग्निशस्त्र घेऊन कोणाची तरी वाट पाहत थांबलेला आहे.” या माहितीची नोंद वरिष्ठ पोलिस निरीक्षक अश्विनी सातपुते यांना देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने तत्काळ छापा टाकून संशयिताला ताब्यात घेतले. पंचासमक्ष त्याची अंगझडती घेतली असता, त्याच्याकडे ₹५०,००० किंमतीचे गावठी पिस्तूल (कट्टा) आणि ₹५०० किंमतीचे एक जिवंत काडतूस आढळून आले.

या प्रकरणी पोलिस अमंलदार सुमित ताकपेरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर २३९/२०२५ अंतर्गत भारतीय हत्यार कायदा कलम ३(२५) सह महाराष्ट्र पोलिस अधिनियम कलम ३७(१) सह १३५ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला अटक करून न्यायालयाच्या आदेशानुसार येरवडा कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.

संबंधित कारवाई पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलिस आयुक्त मनोज पाटील, पोलिस उपायुक्त राजकुमार शिंदे (परिमंडळ ५, पुणे शहर), सहाय्यक पोलिस आयुक्त धन्यकुमार गोडसे (वानवडी विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अश्विनी सातपुते,
पोलिस निरीक्षक (गुन्हे) सुरज बेंद्रे, तपास पथकातील अंमलदार संजय गायकवाड, सुमित ताकपेरे, शिवाजी येवले, आशिष गायकवाड, विशाल जाधव, ज्योतिष काळे, रक्षित काळे, राहुल खाडे आणि दत्ता शेंद्रे यांनी ही कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली.

निलेश घायवळसह बंधुंचा आणखी एक कारनामा समोर…

पुणे! NDA मध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याची आत्महत्या…

गौतमी पाटील कार अपघाताबाबत म्हणाली; मला विनाकारण दोष दिला जातोय…

पुणे ! कोंढव्यात ATS आणि पुणे पोलिसांचे मोठे सर्च ऑपरेशन; संशयित ताब्यात…

पुणे पोलिसांनी काही फटाक्यांवर घातली बंदी; आदेश मोडल्यास…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!