पिंपरी-चिंचवडमधील पोलिसकाकांचे अपघाती निधन…

पुणेः पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या दरोडा विरोधी पथकात कार्यरत असलेले पोलिस अंमलदार राजेश कौशल्य यांचे अपघाती निधन झाले. एमआयडीसी भोसरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत 2 ऑगस्ट रोजी खंडेवस्ती, स्पाईन रोड येथे त्यांचा अपघात झाला होता. उपचारादरम्यान आज (सोमवार) (दि. 14) त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या मृत्युमुळे पोलिस दलात हळहळ व्यक्त केली जात आहे.

पोलिस अंमलदार राजेश कौशल्य यांनी घरफोडीच्या गुन्ह्यात मोठी कामगिरी केल्यानंतर रात्री उशिरा ते घरी जात असताना अपघात झाला होता. राजेश कौशल्य हे सन 2009 साली महाराष्ट्र पोलिस दलात भरती झाले. सुरुवातीला नांदेड येथे त्यांनी काम केले. सन 2018 साली पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयाच्या सुरुवातीला ते पिंपरी-चिंचवड शहरात आले. त्यानंतर त्यांनी गुन्हे शाखेत कार्यरत होते. 2 ऑगस्ट रोजी ते रात्री दीडच्या सुमारास त्यांच्या दुचाकीवरून जात होते. मोशी येथे त्यांच्या दुचाकीला अचानक कुत्रा आडवा आला. त्याला वाचविताना त्यांचे दुचाकीवरील नियंत्रण सुटले आणि त्यांचा अपघात झाला. त्यांनी हेल्मेट घातलेले होते. मात्र, अपघातात त्यांचे हेल्मेट डोक्यावरून निघाले. त्यामुळे ते गंभीर जखमी झाले.

मध्य रात्रीच्या वेळी रस्त्याने येणारे जाणारे कुणीही नव्हते. त्यामुळे सुरुवातीला 15 ते 20 मिनिटे त्यांना कुठलीही मदत मिळाली नाही. काही वेळाने तिथून जाणाऱ्या एका पीएमपी बस चालकाच्या हा प्रकार निदर्शनास आला. त्या चालकाने एमआयडीसी भोसरी पोलिसांना माहिती दिली. त्यांनतर पोलिसांनी त्यांना तत्काळ उपचारासाठी पिंपरी येथील यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयात दाखल केले होते.

राजेश यांच्या अपघाताची माहिती दरोडा विरोधी पथकाला मिळाली. दरोडा विरोधी पथकातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी वायसीएम रुग्णालयात धाव घेतली. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने राजेश यांना पुण्यातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्यांच्यावर तिथे उपचार सुरु होते. पण, उपचारादरम्यान त्यांचा आज मृत्यू झाला.

पोलिसांच्या कुटुंबियांसाठी गृह विभागाने घेतला मोठा निर्णय…

पंढरपूरमध्ये पोलिस उपनिरीक्षकाचा हल्ल्यात मृत्यू…

पोलिसांच्या गाडीला पाठीमागून जोरात धडक; दोन ठार…

पुणे शहरातील पोलिसकाकाची आत्महत्या; चिठ्ठीमध्ये लिहीले की…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!