लातूरमध्ये भीषण अपघातात न्यायाधीशांचा जागीच मृत्यू…

लातूर : लातूर जिल्ह्यातील रेणापूर-उदगीर मार्गावर शुक्रवारी (ता. ११) मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात न्यायाधीशांसह त्यांच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

उद्धव वसंत पाटील असे अपघातात मृत्युमुखी पडलेल्या न्यायाधीशांचे नाव आहे. ते बीडच्या सेशन कोर्टाचे न्यायाधीश होते. त्यांच्या चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव ट्रकने चारचाकीला धडक दिल्याने हा अपघात झाला. हा अपघात इतका भीषण होता की चारचाकीचा चुराडा झाला आहे.

रेणापूर-उदगीर मार्गावर शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ट्रकने चारचाकीला धडक दिली. या अपघातामध्ये न्यायाधीश उद्धव पाटील आणि त्यांच्या चालकाचा मृत्यू झाला. उद्धव पाटील हे लातूर जिल्ह्यातील चाकूर तालुक्यातील अजनसोडा येथील रहिवाशी होते. वर्षभरापूर्वीच त्यांची न्यायाधीशपदी निवड झाली होती. ते बीडच्या सेशन कोर्टात कार्यरत होते. त्यांच्या मृत्यूमुळे जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सातारा जिल्ह्यात भाविकांच्या मोटारीला भीषण अपघात; चौघांचा मृ्त्यू…

सातारा जिल्ह्यात लेकीचाही अपघाती मृत्यू; उदयनराजे यांची भावनिक पोस्ट…

ट्रकचा ब्रेक फेल झाल्यामुळे तिघांना गमवाला लागला जीव…

पुणे-नगर महामार्गावर PMPMLच्या दोन बस समोरासमोर धडकल्या; प्रवासी जखमी…

समृद्धी महामार्गावर भीषण दुर्घटना; 18 जणांचा मृत्यू…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!