ऑनर किलिंग! गर्भवती मुलीचा खून करणाऱ्या बापाला जन्मठेप…

नाशिक : आंतरजातीय विवाह केलेल्या आपल्या गर्भवती मुलीचा गळा आवळून निर्घृण खून करणाऱ्या बापाला 20 वर्ष कारावासाची शिक्षा देण्यात आली आहे. बापाची फाशीची शिक्षा रद्द करत सर्वोच्च न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. नाशिक येथील एकनाथ कुंभारकर याने आपली आंतरजातीय विवाह केलेली गर्भावती मुलगी प्रमिला हिचा 2013मध्ये गळा दाबून खून केला होता. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने […]

अधिक वाचा...

अभिनेता सलमान खान याची सुपारी घेणाऱ्याला पानिपतमधून केली अटक…

मुंबई : हरियाणा पोलिसांसोबत केलेल्या संयुक्त कारवाईत बिश्णोई गँगचा गुंड सुक्खा कालुया याला पानिपतमधून ताब्यात घेतले आहे. नवी मुंबई शहर पोलिस आणि हरियाणा पोलिसांनी संयुक्तपणे ही कारवाई केली. सुक्खा कालुया याने सलमान खानची सुपारी घेतली होती. त्याने सलमान खानच्या घराची रेकीदेखील केली. अभिनेता सलमान खान याच्या मुंबईतील घरावर पहाटेच्या सुमारास एप्रिल महिन्यात गोळीबार झाला होता. […]

अधिक वाचा...

चोराला 10 बायका, 6 मैत्रिणी, 5 स्टार हॉटेलमधील वास्तव्य अन् विमानाने प्रवास…

पाटणा (बिहार) : एका चोराला पोलिसांनी अटक केली असून, त्याची माहिती समजल्यावर धक्का बसला आहे. चोराला 10 पत्नी आणि 6 मैत्रिणी आहेत. त्याच्याकडे जग्वारसारखी महागडी गाडी असून, तो चोरी करण्यासाठी एका शहरातून दुसऱ्या शहरात विमानाने प्रवास करत असे. चोर हा चोरीच्या पैशांतील काही वाटा सामाजिक कामासाठी खर्च करत होता. चोराची एक पत्नी सीतामढी येथील जिल्हा […]

अधिक वाचा...

विकृती Video: घरकाम करणारी महिला स्वयंपाकात करायची लघवी अन्…

नवी दिल्ली: एका बांधकाम व्यावसायिकाकडे स्वयंपाक करणाऱ्या महिलेने तिची लघवी मिसळून स्वयंपाक करत होती. जेव्हा संपूर्ण कुटुंब आजारी पडलं, तेव्हा हा धक्कादायक प्रकार उघड झाला. पोलिसांनी या महिलेला अटक केली आहे. संबंधित घटनेचा संतापजनक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. दिल्लीजवळ असलेल्या गाझियाबादमधून ही धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका […]

अधिक वाचा...

पुणे पोलिसांनी अल्पवयीन लैंगिक अत्याचार प्रकरणातील फरारी आरोपीला अटक केली आहे

पुणे : चार वर्षांच्या चिमुरडीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला पुणे गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरी विरोधी पथकाने अटक केली आहे. मुंढवा परिसरात झालेल्या मारहाणीनंतर आरोपी विजय स्वामी बामू (वय 40, रा. घोरपडी) हा दोन दिवसांपासून फरार होता. आरोपीची गेल्या सात ते आठ वर्षांपासून या कुटुंबाशी ओळख असून ते त्यांच्या घराजवळच राहत होते. थोड्या अंतरावर […]

अधिक वाचा...

भावनिक पोस्ट! आईची शेवटची आठवण आहे; चोराला केली नम्र विनंती…

पुणे : एका युवकाची दुचाकी चोरीला गेली असून, ती त्याच्या आईची शेवटची आठवण होती. सोशल मीडियावर युवकाने भावनिक पोस्ट केली असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहेत. दुचाकी चोरीला गेल्याचे कळताच युवकाने चोराला भावनिक आवाहन करणारी पोस्ट इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे. ‘दसऱ्याच्या दिवशी माझी काळी ॲक्टिव्हा गाडी चोरीला गेली. ती माझ्या आईची गाडी होती. आई […]

अधिक वाचा...

सदस्यांची यादी तयार करणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई गँगवर पुणे पोलिसांची कारवाई

पुणे : अनेक राज्यांमध्ये संघटित गुन्हेगारीमध्ये सहभागी होण्यासाठी कुख्यात असलेली लॉरेन्स बिश्नोई टोळी आता पुणे पोलिसांच्या चाचण्यांखाली आली असून, शहरातील वाढत्या प्रभावाला आळा घालण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत. ही टोळी पुण्यात सक्रिय असल्याचा संशय आल्याने गुन्हे शाखेने या टोळीशी संबंधित व्यक्तींची यादी तयार करण्यास सुरुवात केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांच्या हत्येप्रकरणी लॉरेन्स बिश्नोई […]

अधिक वाचा...

पोलिसांनी सुतावरून गाठवा स्वर्ग; दोघांचे एकाच महिलेसोबत होते प्रेमसंबंध…

बुलढाणा : तब्बल दोन वर्षांपासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा अखेर सांगाडा हाती लागला असून, क्रूरपणे हत्या करून मृतदेह शेताच्या बंधाऱ्यात पुरण्यात आल्याचे आढळून आले. या घटनेमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी सुतावरून स्वर्ग गाठत गुन्ह्याचा तपास केला आहे. खामगाव तालुक्यातील हिवरखेड पोलिस ठाण्यात १८ ऑक्टोबर २०२२ रोजी सविता नंदु धंदरे हिने आपला पती नंदू श्रीराम धंदरे […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक Video! लेकाला वाचवण्यासाठी आई त्याच्या अंगवार पडली, बापाच्या विनवण्या…

मुंबईः मुलाला रिक्षावाले आणि फेरीवाले लाथा-बुक्क्यांनी तुडवत आहे. लेकाला वाचवण्यासाठी आई त्यांच्या अंगावर पडली तर बाप हात जोडून विनवण्या करत होता. पण, मारहाण करणाऱ्यांना किव आली नाही. अंगाचा थरकाप उडवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्या व्यक्तीला रिक्षावाले आणि फेरीवाल्यांनी मारहाण केली, त्याचा मृत्यू झाला. आकाश माईन असे त्याचे नाव असून, तो मनसेचा […]

अधिक वाचा...

Video: नवऱ्याने घराला लावला गुप्त कॅमेरा अन् पत्नीचे अनेक प्रियकर…

न्यूयॉर्कः सुरक्षेच्या कारणास्तव अनेकजण त्यांच्या घरात गुप्त कॅमेरे बसवू लागले आहेत. एका व्यक्तीने आपल्या घरात सुरक्षतेसाठी गुप्त कॅमेरे बसवला होता. मात्र, एकदा सीसीटीव्ही फुटेज तपासत असताना त्याला मोठा धक्का बसला. तो ऑफिसला गेल्यानंतर त्याची पत्नी अनेक पुरुषांना घरी बोलवून घ्यायची, संबंधित दृष्य पाहून त्याला धक्का बसला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला व्हिडिओ एका घरातील […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!