प्रेम! पत्नीने घडवून आणली प्रियकर आणि पतीची भेट अन् पुढे…

लखनौ (उत्तर प्रदेश) : नवऱ्याला अचानक पत्नीच्या प्रेमप्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर त्याने पत्नीला प्रियकराशी ओळख करून देण्यास सांगितले. पत्नीने फोन करून प्रियकराला भेटण्यासाठी बोलवले. दोघांची भेट घडवून आणली. पुढे नवऱ्याने तिच्या प्रियकराची हत्या केल्याची घटना घडली आहे.

आग्रा येथील जंगलात सांगाडा सापडला होता. पोलिसांनी तपास सुरू केला असता अनेक महत्त्वाचे धक्कादायक खुलासे झाले. तपासादरम्यान पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. यामध्ये पती-पत्नीसह अन्य एका युवकाचा समावेश आहे.

‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!

एटा येथील रहिवासी दिलीप यांची हत्या करून मृतदेहाचे तुकडे करून जंगलात फेकून दिले होते. आग्राच्या ताजगंज भागात राहणाऱ्या गोविंदा याचा विवाह एटा येथील एका युवती सोबत झाला होता. पण, तिचे शेजारी राहणाऱ्या दिलीपसोबत पूर्वीपासून प्रेमसंबंध होते. मुलीच्या घरच्यांना प्रेमप्रकरणाची माहिती मिळताच घरच्यांनी विरोध केला आणि आग्राच्या गोविंदा याच्या सोबत लग्न लावून दिले. लग्नानंतरही दोघांचे प्रेमप्रकरण चालू राहिले.

गोविंदाला प्रेमप्रकरणाची माहिती मिळताच त्याने विरोध केला. शिवाय, भेट घडवून आणली. दिलीपने गोविंदाला सतत फोन करून धमक्या देण्यास सुरुवात केली. अखेर गोविंदा आणि त्याच्या दोन साथीदारांनी दिलीपच्या हत्येचा कट रचला. गोविंदाच्या पत्नीने सुद्धा त्याला साथ दिली. तिने दिलीपला फोन करून आग्रा येथे बोलावून घेतले. येथे आल्यानंतर गोविंदाने त्याची पत्नी आणि दोन साथीदारांसह दिलीपला अकबरपूरजवळील जंगलात नेले आणि त्याची निर्घृण हत्या केली.

पोलीस चौकशीत या आरोपींनी सांगितले की, दिलीपचं डोके प्रथम धडावेगळे केले. यानंतर त्याला नाल्यात फेकण्यात आले आणि त्याच्या शरीराचे अवयवही कापण्यात आले. डोक्याच्या सांगाड्याशिवाय पोलिसांनी अनेक अवशेषही जप्त केले असून ते फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत.

शाळेत प्रेम! प्रेमविवाह केलेल्या पती पत्नीचा हृदयद्रावक शेवट…

हृदयद्रावक! पहिल्या नजरेत प्रेम, लग्न अन् अवघ्या ५ महिन्यांची साथ…

नागपूर हादरलं! प्रेमविवाह अन् चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या…

दीर-वहिनीचे प्रेमसंबंध अन् मृत्यूनंतरही चार महिने ‘एक दुजे के लिए’…

प्रेम! दाजी मेव्हणी सोबत तर तिची आई सासऱ्यासोबत पळाली…

दाजी साखरपुड्यातच पडला मेव्हणीच्या प्रेमात अन् नको ते घडलं…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!