अहिल्यानगरच्या पोलिस मुख्यालयात ट्रेनिंगवेळी हँडग्रेनेड फुटला हातात; बोटाच्या चिंधड्या…
अहिल्यानगर : अहिल्यानगर येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानावर सुरू असलेल्या प्रशिक्षणादरम्यान एक गंभीर दुर्घटना घडली आहे. मॉक ड्रिल (Mock Drill) हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जात असताना, एका हँडग्रेनेडचा हातातच भीषण स्फोट झाला. या दुर्घटनेत चार प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचारी गंभीर जखमी झाले आहेत. स्फोट इतका भयानक होता की, यात दोन कर्मचाऱ्यांच्या हाताच्या बोटांच्या चिंधड्या उडाल्या आहेत. आज (सोमवार) […]
अधिक वाचा...पंढरपूर! युवतीवर लैंगिक अत्याचार; पीडितेनं ॲसिड पिऊन संपवलं जीवन…
सोलापूर : पंढरपूर तालुक्यातील पटवर्धन कुरोली येथे एका लैंगिक अत्याचार पीडित मुलीनं ॲसिड पिऊन आयुष्याचा शेवट केला आहे. पीडित मुलीने दीड महिन्यांपूर्वी ॲसिड प्राशन केले होते. यानंतर तिच्यावर पंढरपूर, सोलापूर, पुणे अशा विविध ठिकाणी उपचार सुरू होते. मात्र तिची मृत्यूची झुंज संपली आहे. तिने सोलापूरात उपचारादरम्यान अखेरचा श्वास घेतला आहे. या संतापजनक घटनेमुळे संपूर्ण सोलापूर […]
अधिक वाचा...पुणे शहरात १४ दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश लागू; पाहा नियमावली…
पुणे (संतोष धायबर) : पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पुणे पोलिस प्रशासनाने एक मोठा निर्णय घेतला आहे. पुण्यात मंगळवारी (ता. २६) रात्रीपासून पुढील १४ दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. पुणे शहरात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि संस्थांकडून मोठ्या प्रमाणावर आंदोलने, निदर्शने आणि मोर्चे काढले जात आहेत. यामुळे शहरातील शांतता धोक्यात […]
अधिक वाचा...भीषण अपघात! सातारच्या आठ मित्रांची हर्णे बीचची ट्रीप ठरली अखेरची; पाहा मृतांची नावे…
रायगड: रायगड जिल्ह्याच्या आंबेनळी घाटात रविवारी रात्रीच्या सुमारास पर्यटकांची एक स्कॉर्पिओ गाडी अनियंत्रित होऊन थेट ७०० ते ८०० फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात गाडीतील सर्व ८ जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे सर्व मृत पर्यटक सातारा जिल्ह्यातील रहिवासी आहेत. सर्वजण वीकेंड साजरा करण्यासाठी शुक्रवारी दापोलीजवळील हर्णे बीचवर गेले होते. मात्र त्यांची ही कोकण […]
अधिक वाचा...मॉडेल त्विशा शर्मा मृत्यू प्रकरणात ट्विस्ट; पोलिसांचा मोठा निर्णय…
भोपाळ (मध्य प्रदेश): त्विशा शर्मा मृत्यू प्रकरणी ट्विस्ट आला असून, त्विशाच्या मृतदेहाचे दुसरे पोस्टमार्टम भोपाळच्या एम्स (AIIMS) रुग्णालयातच केले जाईल, असे भोपाळचे पोलिस आयुक्त संजय कुमार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. मुख्य आरोपी समर्थ सिंह याला न्यायालयात हजर करून पोलिस त्याची ७ दिवसांची कोठडी (रिमांड) मागणार आहेत, जेणेकरून या प्रकरणातील प्रत्येक पैलूचा तपास करता येईल. पोलिस […]
अधिक वाचा...नाशिक! दाजीला झाला राग अनावर अन् घेतला मेव्हणीचा जीव…
नाशिक: कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी गेलेल्या मेव्हणीचा दाजीने जीव घेतल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या देवळा तालुक्यातील भऊर फाटा परिसरात घडली आहे. छाया ज्ञानेश्वर जाधव असे मृत महिलेचे नाव तर श्याम माळी असे आरोपी दाजीचे नाव आहे. आरोपी श्याम माळी आणि त्याच्या पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत असत. कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी आणि श्यामची समजूत काढण्यासाठी मृत छाया जाधव या […]
अधिक वाचा...पुणे ग्रामीण आणि बारामती शहर पोलिसांची मोठी कारवाई…
पुणे: पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा आणि बारामती शहर पोलिसांनी आंतरराज्यीय गांजा तस्करी उघड केली असून, 23 किलो गांजा जप्त केला आहे. तर आतापर्यंत फेब्रुवारीपासून या कारवाईत तब्बल 634 किलो गांजा, दोन चारचाकी वाहने आणि इतर मुद्देमाल असा एकूण सुमारे 3 कोटी 3 लाख 96 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून सात आरोपींना […]
अधिक वाचा...IPS विनायक भोसले यांनी बनावट कर्ज टोळीचा केला पर्दाफाश…
मेरठ (उत्तर प्रदेश): मेरठ येथे जिल्हा स्वाट टीम, सायबर सेल आणि कोतवाली पोलिसांनी संयुक्त कारवाई करत बेकायदेशीर टेलिफोन एक्सचेंज आणि ऑनलाइन बनावट कर्ज देणाऱ्या टोळीचा भांडाफोड केला आहे. या प्रकरणात पोलिसांनी बीसीएच्या विद्यार्थ्यासह तिघांना अटक केली आहे. हा विद्यार्थी आपल्या साथीदारांसह संपूर्ण नेटवर्क चालवत असल्याचे तपासात समोर आले आहे. एसपी सिटी विनायक गोपाल भोसले यांनी […]
अधिक वाचा...पुणे! माझी बायको कुठंय? मित्रावरच आला संशय अन् रात्रीच्या अंधारात…
पुणे : पुणे शहरातील आंबेगाव परिसरात रात्रीच्या वेळी दोघं मित्र एका गाडीत एकत्र बसून मद्यपान करत होते. अचानक आरोपी तेजस पवार याने आपली बेपत्ता असलेली पत्नी आपल्याच मित्राच्या संपर्कात आहे आणि ती त्याच्याशी बोलते, या संशयातून त्याने मित्राच्याच डोक्यात थेट बिअरची बाटली फोडली आणि गंभीर जखमी केले. याप्रकरणी आंबेगाव पोलिसांनी संशयित आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला […]
अधिक वाचा...कोल्हापूर! ग्रुपवर केलेल्या कमेंटच्या रागातून एकाला भरदिवसा संपवले…
कोल्हापूर: सोशल मीडियावरील ग्रुपवर केलेल्या कमेंटच्या रागातून एकाला भरदिवसा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हापुरातील जयसिंगपूर येथे गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास युवकाचा चाकूने भोसकून खून केला. साहिल झाकीर काझी (वय 29) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी राजू लक्ष्मण कांबळे (वय 30) याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार, आरोपी राजू कांबळे आणि साहिल […]
अधिक वाचा...
