कोल्हापूर! ग्रुपवर केलेल्या कमेंटच्या रागातून एकाला भरदिवसा संपवले…

कोल्हापूर: सोशल मीडियावरील ग्रुपवर केलेल्या कमेंटच्या रागातून एकाला भरदिवसा संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कोल्हापुरातील जयसिंगपूर येथे गुरुवारी दुपारी तीनच्या सुमारास युवकाचा चाकूने भोसकून खून केला. साहिल झाकीर काझी (वय 29) असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी राजू लक्ष्मण कांबळे (वय 30) याला अटक करण्यात आली आहे.

Buy Maharashtrache Dada Book Discount Price : 165 + Postage Charges WhatsApp : 93712 69949
Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 165 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949

पोलिसांकडून मिळालेली माहितीनुसार, आरोपी राजू कांबळे आणि साहिल काझी यांच्यात गाडीच्या कर्जाचे हप्ते भरण्यावरून जुना वाद होता. यातच सोशल मीडियावरील ग्रुपवर काही कमेंट्स केल्या होत्या.आरोपी राजू कांबळे याने साहिल आणि त्याचा मित्र कार्तिक कलकुटगी याला चर्चेसाठी बोलावले होते. जयसिंगपूर येथील पोस्ट कार्यालयाच्या मागील बाजूच्या रस्त्यावर वाद मिटवण्यासाठी आले होते. परंतु, वाद वाढतच गेला. तेव्हा राजूने चाकू काढून साहिलच्या छातीवर आणि दंडावर वार केले. घटनेनंतर तो तिथून फरार झाला. गंभीर जखमी अवस्थेत साहिलला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली. खुनाच्या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून, पोलिस सोशल मीडियावरील ग्रुपवर नेमक्या कोणत्या कमेंट झाल्या? तसेच हा ग्रुप कोणत्या कारणासाठी वापरला जातो? याचा तपास करीत आहेत.

महाराष्ट्र पोलिस दलात मोठा फेरबदल; अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या…

कोल्हापूरमध्ये युवतींचे लैंगिक शोषणानंतर बनवले Video; मित्रानेच केला गेम…

कोल्हापूर! प्रेमी युगुलाची घनदाट जंगलात गळफास लावून आत्महत्या…

कोल्हापूर! आराम बसवर 1 कोटी 22 लाखांचा दरोडा अन् 12 तासांत सात आरोपी जेरबंद…

कोल्हापूर! शिक्षकाला महिलेच्या घरात रंगेहाथ पकडले अन्…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!