हृदयद्रावक! आळंदीवरून सहलीला गेलेले ८ विद्यार्थी दिवेआगर बीचवर बुडाले, पाहा नावे…

रायगड : दिवेआगर येथे सहलीसाठी आलेल्या आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. मृत विद्यार्थ्यांना समुद्राबाहेर काढण्यात आले असून, हे सगळे विद्यार्थी आळंदी (जि. पुणे) येथील एका खासगी क्लासमध्ये शिकत होते. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. आळंदी येथील विनर्स अकादमीमध्ये शिक्षण घेत असलेल्या ४२ विद्यार्थ्यांचा समूह रायगडमधल्या दिवेआगर बीचवर सहलीसाठी आला […]

अधिक वाचा...

ईडीचे पॅनकार्ड क्लबवर छापे; ६४६.५८ कोटी रुपयांच्या २११ स्थावर मालमत्ता जप्त…

मुंबईः अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) मुंबई विभागीय कार्यालय-१ ने, मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा (पीएमएलए), २००२ अंतर्गत पॅनकार्ड क्लब्स लिमिटेड आणि इतरांविरुद्धच्या मनी लाँडरिंग प्रकरणात, ६४६.५८ कोटी रुपये किमतीच्या सुमारे २११ स्थावर मालमत्ता तात्पुरत्या स्वरूपात जप्त केल्या आहेत. अंमलबजावणी संचालनालयाच्या माहितीनुसार, जप्त केलेल्या मालमत्तांमध्ये व्यावसायिक कार्यालयीन जागा, आलिशान हॉटेल्स, कार्यरत रिसॉर्ट्स, शेतजमीन आणि निवासी मालमत्तांचा समावेश आहे. […]

अधिक वाचा...

हात व मान जवळजवळ धडापासून वेगळे; इस्रायली दंतवैद्याने स्मित मछार यांचा वाचवला जीव…

तेल अवीवः फ्लायदुबई विमान अपघातातील नायक कॅप्टन स्मित मछार गंभीर जखमी झाले आहेत. जगभरातून त्यांच्या शौर्याची प्रशंसा होत आहे. उड्डाणादरम्यान सह-वैमानिकाने त्यांच्यावर एका धारदार शस्त्राने हल्ला केला होता. त्यांच्या शरीरातून मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होत होता आणि ते बेशुद्ध पडणार होते. तरीही, त्यांनी कॉकपिटचा दरवाजा उघडला आणि विमानात असलेल्या १७४ लोकांचे प्राण वाचवले, असे त्या विमानातील एका […]

अधिक वाचा...

पुणे! पिंपरी-चिंचवडमधील हत्येच्या गुन्ह्यात HIV बाधित महिलेला जामीन…

पुणे: सांगवी पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या खुनाच्या गुन्ह्यात आरोपी श्रीमती सेल्वराज राजंगम यांना पिंपरी-चिंचवड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. सदर प्रकरणातील आरोपीने अॅड. प्रसाद विराज निकम व अॅड. मन्सूर तांबोळी यांच्या मार्फत न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता. आरोपीविरुद्ध सांगवी पोलिस ठाणे येथे C.R. No. 303/2026 अन्वये भारतीय न्याय संहिता कलम 103(1) […]

अधिक वाचा...

पाकिस्तानातून तमिळनाडूत होणारी ३ हजार कोटींची ड्रग तस्करी, भारतीय तटरक्षक दलाने हाणून पाडली; पाच पाकिस्तान्यांना अटक…

नवी दिल्ली: भारतीय तटरक्षक दल आणि गुजरात एटीएसचे अधिकारी आणि जवान, अरबी समुद्राच्या मध्यभागी संशयास्पदरित्या हालचाल करणाऱ्या आझाद नावाच्या एका इराणी जहाजावर पाळत ठेवून होत्या. अनेक दिवसांच्या पाळतीनंतर आणि पाठलागानंतर त्यांनी या जहाजाला अडविले. तपासणीमध्ये बोटीत एकूण ५२६ किलो अंमली पदार्थ सापडले. त्याचे आंतरराष्ट्रीय बाजारातील मूल्य सुमारे ३ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याचा अंदाज आहे. […]

अधिक वाचा...

धीरेंद्र शास्त्री यांच्या धर्मांतराबाबतच्या वक्तव्यावरून पंजाबमध्ये गोंधळ; शाही इमामांचा पोलिसांत जाण्याचा इशारा…

लुधियाना: पंजाबमधील लुधियानामध्ये चालू असलेल्या ‘श्री हनुमान कथे’दरम्यान बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांनी केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. पंजाबमधील अमली पदार्थांचे व्यसन आणि धर्मांतराच्या विषयावर चर्चा करत असताना, त्यांनीकेलेल्या वक्तव्यावर लुधियानाचे शाही इमाम मौलाना उस्मान रहमानी लुधियानवी यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. शाही इमामांनी या विषयावर तातडीची बैठक बोलावली असून, शास्त्री यांनी आपले […]

अधिक वाचा...

युवतीला बाप-चुलत्याने हालहाल करून मारलं; पुण्यात संपवलं अन् सातारा…

सातारा: खंडाळा तालुक्यातील राजेवाडी येथे रस्त्याच्या कडेला निर्जनस्थळी 14 सप्टेंबर रोजी युवतीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली होती. स्थानिक गुन्हे शाखेने तपासाची चक्रे फिरवत या प्रकरणाचा उलगडा केला आहे. मुलगी रात्री अपरात्री मुलांसोबत बाहेर फिरते, उलटे बोलते म्हणून वडिलांनीच चुलत चुलत्याला सोबत घेत मुलीला संपवलं. यानंतर पोलिसांनी वडील आणि चुलत्याला अटक केली. हर्षदा हणुमंत जाधव (वय […]

अधिक वाचा...

भारतीय वैमानिक जखमी होऊनही भिडला, 174 प्रवाशांचा वाचवला जीव…

दुबईः दुबईहून तेल अवीवला जाणारे प्रवासी विमान हायजॅक झाल्याचा संदेश नियंत्रण कक्षाला गेल्यानंतर जगभरात खळबळ उडाली होती. दुबईवरुन इस्त्रायलच्या तेल अवीवला जाणारे फ्लाय दुबईचे (Fly dubai) प्रवासी विमान क्रॅश होण्यापासून वाचवणारे भारतीय वंशाचे कॅप्टन स्मित मच्छार यांचे इस्रायलचे पंतप्रधान बिन्यामिन नेत्यानाहू यांनी कौतुक केले आहे. भारतीय कॅप्टन स्मित मच्छार (Smit Machchhar) यांनी दाखवलेल्या अतुलनीय धैर्याबद्दल […]

अधिक वाचा...

पडद्याआड राहून मित्रानेच काटा काढला; गोळीबारानंतर रुग्णालयात नेले; प्रदीप पूर्णेकर हत्या प्रकरणाचा नवा कोन…

ठाणे: मानपाडा येथील राजकीय गोळीबाराच्या घटनेने मुंबईसह, ठाण्यातील राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे मानपाडा विभाग प्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्यावर काल रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास गोळीबार झाल्याची घटना घडली. यावेळीपूर्णेकर यांच्यावर ५ राऊंड फायर झाले. त्यापैकी, २ गोळ्या त्यांना लागल्याची प्राथमिक माहिती असून, एक गोळी मानेवर तर दुसरी गोळी पायावर लागली आहे. त्याशिवाय […]

अधिक वाचा...

बीड! प्रेमाच्या त्रिकोण अन् आईच्या प्रियकरावर गोळीबार…

बीड: प्रेमाच्या त्रिकोणातून मुलानं आईच्या प्रियकरावर गोळीबार केल्याची घटना गेवराई परिसरात घडली. यामध्ये शेख मुसा हे गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून, तिघांना ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. शेख मुसा हे गेल्या चार वर्षांपासून शंकुतला शिंदे हिच्यासोबत राहत होते. काही दिवसांपूर्वी शंकुतला हिने मुसा यांच्यासोबत राहणे सोडले. […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!