
नाशिक हादरलं! एकाच विहिरीत आढळले दोन मुलींचे मृतदेह…
नाशिक : नाशिक जिल्ह्याचील कळवण तालुक्यात एका विहिरीमध्ये दोन मुलींचे मृतदेह आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. माधुरी मोरे (वय २०) आणि गीतांजली एखंडे (वय १३) मृत मुलींची नावे आहेत. या प्रकरणी भावना पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
कळवण तालुक्यातील एका विहिरीमध्ये दोन मुलींचे मृतदेह आढळून आले आहेत. एकाच वेळी दोन मुलींचे मृतदेह आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. माधुरी मोरे आणि गीतांजली एखंडे अशी विहिरीत मृतदेह आढळून आलेल्या मुलींची नावे आहेत. कळवणच्या लिंगामे गावातील गोपीनाथ पालवी यांच्या शेतातील विहिरीत हे मृतदेह आढळून आले आहेत. दरम्यान या प्रकरणात भावना पोलिसांकडून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
दरम्यान, एकाच विहिरीमध्ये दोघींचा मृतदेह आढळून आल्यानंतर नाशिक जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मात्र हा घातपात आहे की आत्महत्या? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
नाशिकमध्ये प्रियकराला संपवण्यासाठी शिक्षिकेने दिली विद्यार्थ्यांनाच सुपारी…
महाराष्ट्र हादरला! नाशिकमध्ये चिमुकलीचे अपहरण करून अत्याचार…
नाशिकमध्ये पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या; चिठ्ठीत म्हटले…
धक्कादायक! नाशिकमध्ये चिमुकल्याचे अपहरण अन् अत्याचार करून हत्या…
नाशिकमध्ये सपासप 13 वार करुन युवकाची भर रस्त्यात हत्या…

