पोलिसांवर गोळीबार करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला पिपराइचमध्ये अटक…

गोरखपूरः मंगळवारी पहाटे पिपराइच येथील जंगल धुशन चौकात तपासणी मोहिमेदरम्यान एका गुन्हेगाराने पोलिसांवर केलेल्या गोळीबारात एका पोलिसाच्या डाव्या हाताला गोळी लागून तो जखमी झाला आहे. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात दुसऱ्या एका गुन्हेगाराच्या डाव्या पायात गोळी लागली आणि पोलिसांनी त्याला पकडले. पोलिसांना गुंगारा देऊन एक गुन्हेगार पळून जाण्यात यशस्वी झाला. अटक करण्यात आलेला गुन्हेगार मुमताज हा […]

अधिक वाचा...

पंजाब नॅशनल बँकेत १७ कोटी रुपयांच्या बनावट नोटा; ३ अधिकारी निलंबित…

सहारनपूरः उत्तर प्रदेशातील पंजाब नॅशनल बँकेच्या येथील सोफिया मार्केट शाखेच्या करन्सी चेस्टच्या ऑडिटमध्ये, १७ कोटी रुपयांच्या बनावट नोटा सापडल्याने खळबळ उडाली आहे. तपासात सहभाग असल्याचे उघड झाल्यानंतर तीन अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले. प्राथमिक तपासात ७ कोटी रुपयांच्या बनावट नोटा आढळून आल्या होत्या. बनावट चलन सापडल्याप्रकरणी पीएनबीचे मुख्य व्यवस्थापक आणि तपास अधिकारी अरुण कुमार चौबे यांनी […]

अधिक वाचा...

१४ वर्षांपूर्वी पोलिस गोळीबारात मुलगा मृत्यूमुखी पडलेल्या ठिकाणीच पित्याची आत्महत्या…

अहमदाबाद: गुजरातच्या सुरेंद्रनगर जिल्ह्यातील थांगड पोलीस गोळीबार घटनेत २०१२ मध्ये मृत्यूमुखी पडलेल्या आपल्या मुलाला न्याय मिळवून देण्यासाठी, ज्या परिसरात त्यांचा मुलगा पंकज सुमरा (वय १६) पोलिसांच्या गोळीबारात ठार झाला होता, त्याच परिसरात अमरशीभाई सुमरा (वय ५३) यांनी धावत्या ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. गेल्या १४ वर्षांपासून संघर्ष करणाऱ्या एका हताश पित्याने त्याच परिसरात आपले जीवन […]

अधिक वाचा...

परवाना निलंबित, मालकाला तुरुंगवास… तरीही फटाक्यांचा कारखाना सुरूच; कौशांबीमधील ११ मृत्यूंसाठी जबाबदार कोण?

प्रयागराजः कौशांबीच्या पिपरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गेल्या दोन वर्षांपासून फटाक्यांचा एक बेकायदा कारखाना सुरू होता. कारखान्याला लागून असलेल्या घरावर दारूगोळ्याचा ढिगारा होता. फटाक्यांच्या निर्मितीसोबतच, त्यांची मोठ्या प्रमाणावर साठवणूक आणि विक्रीही केली जात होती. गावातील बेकायदेशीर कारखाना, गोदाम आणि अवैध कारवायांकडे पोलिस आणि प्रशासन पूर्णपणे दुर्लक्ष करत राहिले. सोमवारच्या स्फोटात ११ जणांचा बळी गेल्यानंतरच जबाबदार अधिकारी […]

अधिक वाचा...

बालिकेवर लैंगिक अत्याचार; दिल्लीत टॅक्सी चालकाला अटक

नवी दिल्लीः दिल्लीच्या बवाना येथे एका खासगी शाळेतील नर्सरीत जाणाऱ्या बालिकेला, चॉकलेटचे अमिष दाखवून तिला अयोग्यरित्या स्पर्श करून लैंगिक अत्याचार केला. या प्रकरणी पोलिसांनी शाळेत काम करणाऱ्या एका टॅक्सी चालकाला अटक केली आहे. बालिकेच्या वागण्यात बदल झाल्याचे लक्षात आल्यानंतर, तिच्या आईने विचारल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले. त्या मुलीने तिच्या आईला शाळेतील एका ‘वाईट काका’बद्दल सांगितले. […]

अधिक वाचा...

अंकित बलियान हत्या प्रकरणी उत्तर प्रदेशात एन्काउंटर; दोन मुख्य मारेकरी ठार

शामलीः उत्तर प्रदेश पोलिस आणि विशेष कृती दलाने (एसटीएफ) हरियाणातील गायक आणि अभिनेता अंकित बलियान यांच्या हत्येमध्ये सामील असलेल्या दोन मुख्य मारेकऱ्यांना ठार केले. ही चकमक सोमवारी पहाटे शामलीतील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत झाली. पोलीस अधीक्षक (एसपी) एन. पी. सिंग यांनी दिलेल्या माहितीनुसार, बलियान हत्याकांडातील मुख्य मारेकरी शामलीच्या दिशेने जात असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना पहाटे […]

अधिक वाचा...

अल्पवयीन मुलीवर धावत्या बसमध्ये सामूहिक बलात्कार करून दिल्लीत फेकून दिले…

नोएडाः उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील अकरावीत शिकणाऱ्या एका १६ वर्षीय विद्यार्थिनीवर धावत्या स्लीपर बसमध्ये सामूहिक बलात्कार झाल्याची एक भीषण घटना घडली आहे. कौटुंबिक वादानंतर नोएडामधील आपल्या चुलत भावाच्या घरी जात असलेली ही पीडित मुलगी, रस्त्यात एकटी उभी असताना बस चालक आणि वाहकाने तिला लक्ष्य केले. दिल्ली आणि एनसीआर पोलिसांनी तातडीने कारवाई करत चालक कुलदीप आणि […]

अधिक वाचा...

गायक अंकित बालियान हत्याकांडातील 2 आरोपींचं एन्काऊंटर…

लखनौ (उत्तर प्रदेश): गायक आणि युट्युबर अंकित बालियान याच्या निर्घृण हत्या प्रकरणी पोलिसांनी दोन मुख्य आरोपींचं एन्काऊंटर केले आहे. मारल्या गेलेल्या आरोपींची नावे सुमित आणि मोहित अशी असून ते हरियाणातील रहिवासी होते. या हत्येमध्ये एकूण चार शूटर आणि रेकी करणारे दोन असे एकूण सहा जण सहभागी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर […]

अधिक वाचा...

कारने पाठलाग; संधी मिळताच ‘आप’ नेत्याची गोळ्या झाडून हत्या…

फिरोजपूरः कारमधून आलेल्या दोन संशयितांनी, आपल्या एका सहकाऱ्यासह दुचाकीवरून जाणाऱ्या गुरप्रीत सिंग नावाच्या एका स्थानिक आम आदमी पार्टीच्या नेत्याची अंदाधुंद गोळीबार करून हत्या केली आहे. पंजाब राज्यात फिरोजपूर जिल्ह्यातील ममडोट येथे ही घटना घडल्याचे पोलिसांनी सांगितले. एका नेत्याची अशाप्रकारे हत्या केल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपीची ओळख […]

अधिक वाचा...

सोशल मीडिया स्टारला झाडाला बांधून जिवंत जाळले, लिव्ह इन रिलेशनशिपचं कनेक्शन…

चंडीगडः ओळखीच्या व्यक्तींनीच अपहरण करून झाडाला बांधून सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर असलेल्या एका मनजीत कौर नावाच्या महिलेला जिवंत जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या दोन फरारी संशयितांचा, हरियाणा पोलिस तपास करत आहेत. दरम्यान, गंभीररित्या भाजलेल्या मनजीत कौर या महिलेचा उपचार चालू असतानाच मृत्यू झाला आहे. यासंदर्भात अधिक माहिती अशी, की मनजीत कौर हिचे आठ आठवड्यांपूर्वी दोन ओळखीच्या व्यक्तींनी अपहरण […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!