गायक अंकित बालियान हत्याकांडातील 2 आरोपींचं एन्काऊंटर…

लखनौ (उत्तर प्रदेश): गायक आणि युट्युबर अंकित बालियान याच्या निर्घृण हत्या प्रकरणी पोलिसांनी दोन मुख्य आरोपींचं एन्काऊंटर केले आहे. मारल्या गेलेल्या आरोपींची नावे सुमित आणि मोहित अशी असून ते हरियाणातील रहिवासी होते. या हत्येमध्ये एकूण चार शूटर आणि रेकी करणारे दोन असे एकूण सहा जण सहभागी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उत्तर प्रदेशातील शामली येथील कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत बुधवारी संध्याकाळी पावणेसात वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अंकित बालियान जिममधून बाहेर पडून आपल्या कारच्या दिशेने जात होते. यावेळी दोन मोटरसायकलवरून आलेल्या चार हल्लेखोरांनी त्याच्यावर अंदाधुंद गोळीबार केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बालियानला तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. शवविच्छेदन अहवालानुसार, अंकितला पाच गोळ्या लागल्या होत्या, ज्यातील दोन गोळ्या थेट त्याच्या डोक्यात झाडण्यात आल्या होत्या.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

दरम्यान, या हत्येचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावरही व्हायरल झाला होता. या प्रकरणी उत्तर प्रदेश स्पेशल टास्क फोर्स आणि पोलीस पथकांनी शामली, गाझियाबादचे लोनी, दिल्ली आणि सोनीपत येथील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. या फुटेजच्या आधारे चारही हल्लेखोरांची ओळख पटवण्यात आली, ज्यातील दोन शूटर हरियाणाच्या हिसार आणि रोहतकचे रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले होते.

अंकित बालियान हा शामलीतील बंतीखेडा गावचा रहिवासी होता. सुरुवातीला तो एक राज्यस्तरीय कबड्डी खेळाडू होता. मात्र, दुखापतीमुळे त्याला क्रीडा क्षेत्र सोडावे लागले होते. त्यानंतर त्याने हरियाणवी संगीत क्षेत्रात पदार्पण केले. त्याने ५० हून अधिक गाण्यांद्वारे स्वतःची मोठी ओळख निर्माण केली होती. बालियानच्या वडिलांच्या तक्रारीवरून दाखल झालेल्या गुन्ह्यानंतर पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन आरोपींचा एन्काऊंटर केला असून, उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मुंबईच्या पवई भागात 17 मुलांना ओलीस ठेवणाऱ्याचा एन्काऊंटर…

राजधानीत ऐन दिवाळीत चार गुंडांचं पोलिसांकडून एन्काऊंटर; पाहा नावे…

अभिनेत्री दिशा पटानी हिच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन्ही आरोपींचा एन्काऊंटर…

पुणे शहरातील गुंडाचा सोलापूरात पहाटेच्या सुमारास एन्काऊंटर…

खळबळनक पोस्ट! अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर स्वसंरक्षणार्थ की जाणूनबुजून केलेला कट…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!