खंडनीसाठी अपहरण! पोलिसांनी मोटारीची डिकी उघडली अन्…
नवी दिल्लीः 1 कोटी रुपयांच्या खंडणीसाठी चोरट्यांनी व्यावसायिकाच्या 18 वर्षांच्या मुलाचे अपहरण केले आणि त्याला हरियाणातील फरिदाबाद येथून नोएडामार्गे उत्तर प्रदेशात आणले. पण, यमुना एक्स्प्रेस वेवर कार टोल मेसेज व्यावसायिकाच्या फोनवर पोहोचला आणि अपहरणकर्तांचे ठिकाण कळले. पोलिसांनी त्यांना आग्राजवळ पकडले असून, अपहरण झालेल्या मुलालाही मोटारीच्या डिक्कीमधून सुखरूप बाहेर काढून सुटका केली.
इशांत अग्रवाल (वय १८, रा. फरिदाबाद) हा बीबीएचा विद्यार्थी आहे. त्याचे वडील आशिष अग्रवाल हे फर्निचर व्यावसायिक आहेत. इशांत फरिदाबादहून नोएडाला बहिणीच्या घरी जाण्यासाठी निघाला होता. त्याच्यासोबत वडील आशिष अग्रवाल यांची कार आणि त्यांचा ड्रायव्हर आकाश यादव (रा. मैनपुरी, उत्तर प्रदेश) होता. इशांत नोएडाला पोहोचला नाही तेव्हा आशिष अग्रवाल यांनी त्याला फोन केला. पण, इशांतचा फोन बंद होता आणि आकाशही फोन उचलत नव्हता. कुटुंबियांनी इशांतचा शोध सुरू केला. इशांतचे वडील आशिष अग्रवाल यांच्या मोबाइलवर यमुना एक्स्प्रेस वे टोलचा मेसेज आल्यावर त्यांना संशय आला.
आशिषच्या कारमध्ये फास्ट टॅग लावण्यात आला होता. टोल ओलांडताच पैसे कापले गेले, याचा मेसेज थेट आशिष अग्रवाल यांच्या मोबाईलवर गेला. त्यांनी तत्काळ पोलिस व टोल कर्मचाऱ्यांना याची माहिती दिली. यानंतर फरिदाबाद पोलिसांनी यमुना एक्सप्रेस वेवरील सर्व पोलिस ठाण्यांना अलर्ट केले. आग्रा आणि परिसरातील पोलिस सक्रिय झाले. रास्ता रोको करून तपास सुरू करण्यात आला. एक संशयास्पद कार दिसली. पोलिसांनी तपासणी केली असता, त्याच्या डिक्कीमध्ये इशांत सापडला.
एसीपी एतमादपूर सौरभ सिंह यांनी सांगितले की, ‘खंदौली पोलिस स्टेशनला अपहरणाची माहिती मिळाली होती. इशांत अग्रवाल याचे ड्रायव्हर आकाश यादव अपहरण करून त्याला यमुना एक्स्प्रेस वेवर घेऊन जात आहे. त्यावर संपूर्ण टीमसह एक्स्प्रेस वे टोल नाक्यावर सखोल तपासणी सुरू करण्यात आली. सुमारे 30 मिनिटांनंतर ती कार नोएडाहून येताना दिसली. अपहरणकर्तांनी तपासणी करताना पाहिले असता त्यांनी वाहन पळवून नेण्याचा प्रयत्न केला. पण अखेर पकडले गेले. पोलिसांनी गाडीची डिक्की उघडली तेव्हा इशांत अग्रवाल दिसला. त्यानंतर पोलिसांनी दोन अपहरणकर्तांना ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.’
बिल्डर अपहरण प्रकरण! भारत-पाक सीमेवजवळून 1 कोटी 33 लाखांची कॅश जप्त…
अल्पवयीन मुलाचे अपहरण करून ३० लाखांची मागणी; अडीच तासात ताब्यात…
नवविवाहितेच्या अपहरण प्रकरणाला लागले वेगळे वळण…
आमदारपुत्राची दादागिरी; बंदुकीच्या धाकाने व्यावसायिकाचे अपहरण…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!