Video: पोलिसकाका क्राईम ताज्या घडामोडी….
नमस्कार, पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी… पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरणात मुख्यमंत्र्यांचा मोठा निर्णय मुंबई : पुणे पोर्शे हिट अँड रन प्रकरणातील मृत्यूमुखी पडलेला युवक आणि युवतीच्या वडिलांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वर्षा निवासस्थानी येऊन भेट घेतली. यावेळी दोषींवर कठोरात कठोर करवाई व्हावी यासाठी हा खटला फास्ट ट्रॅक चालवण्याचा प्रयत्न करणार […]
अधिक वाचा...पुणे ग्रामीण पोलिस दलातील महेश गायकवाड यांची संचालक पदावर निवड…
पुणेः पोलिस सोसायटी संचालक पदावर पुणे ग्रामीण पोलिस दलातील महेश गायकवाड यांची निवड झाली आहे. निवडीनंतर त्यांच्यावर विविध क्षेत्रातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. स्वातंत्र पूर्व काळात २० जुन १९२० रोजी पोलिसांसाठी सहकार तत्वावर चालणारी दि पुना डिस्टीक्ट पोलिस को-ऑप. क्रेडीट सोसायटी या संस्थेची स्थापना करण्यात आलेली आहे. सदर संस्थेची व्याप्ती वाढत जावून आजतयागत संस्थेचे पुणे […]
अधिक वाचा...कुलदीपचा मृतदेह लटकलेला दिसताच नातेवाईकांना बसला धक्का…
नाशिक : मालेगाव येथील तंत्रनिकेतन महाविद्यालयात टायपिंगच्या परीक्षेसाठी चोपडा तालुक्यातील चहार्डी येथून आलेला विद्यार्थी बेपत्ता झाला होता. त्याचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. कुलदीप उर्फ भटू सुधाकर पाटील (वय 26) असे या विद्यार्थ्यांचे नाव आहे. कुलदीप याचा छावणी पोलिस स्टेशन समोर सुरु आलेल्या बांधकाम इमारतीच्या एका खोलीत गळफास आणि कुजलेल्या अवस्थेत आढळून […]
अधिक वाचा...धक्कादायक! नवविवाहीत पत्नी शरीर संबंध ठेऊ देत नाही म्हणून…
पुणेः नवविवाहीत पत्नी शरीर संबंध ठेऊ देत नसल्याच्या कारणावरून व तिचे विवाह बाह्य संबंध असल्याच्या संशयातून संतापलेल्या पतीने पत्नीला देहू येथील घाटावर फिरायला नेत तिची ओढणीच्या साह्याने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे. दोन महिन्यांपूर्वीच दोघांचा विवाह […]
अधिक वाचा...बापरे! पाण्याच्या सीलबंद बाटलीत आढळली मेलेली पाल…
रांची (झारखंड) : झारखंडमधील टाटानगर रेल्वे स्टेशन पार्किंग परिसरात एका व्यक्तीने पाणी विकत घेतल्यानंतर सीलबंद बाटलीमध्ये मेलेली पाल आढळून आल्यानंतर खळबळ उडाली आहे. सिल्की ड्रॉप या कंपनीच्या विक्रीसाठी आणलेल्या बाटलीमध्ये ही पाल आढळून आली आहे. टाटानगर मंडळ काँग्रेसचे अध्यक्ष मुन्ना मिश्रा आणि बाटली विकत घेणारे अरुण सिंग यांनी याबाबत संताप व्यक्त केला आहे. दुकानदार मोना […]
अधिक वाचा...धक्कादायक! लग्नासाठी तयार होत असलेल्या प्रेयसीचा पाठलाग केला अन्…
लखनौ (उत्तर प्रदेश) : झाशीमध्ये एका नववधूची तिच्या प्रियकराने गोळ्या झाडून हत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. २३) घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. प्रियकराने आपल्या प्रेयसीला रविवारी सायंकाळी उशिरा ब्युटी पार्लरमध्ये जाताना पाहिले होते. शिवाय, तिचे लग्न होणार असल्याचे समजल्यानंतर त्याचा संयम सुटला. मध्य प्रदेशातील सोनागिरी पोलिस ठाण्याच्या हद्दीतून […]
अधिक वाचा...प्रेम! दाजी मेव्हणी सोबत तर तिची आई सासऱ्यासोबत पळाली…
पाटणा (बिहार): बिहारमधील मुझफ्फरपूरच्या सकरा पोलिस ठाणे परिसरात एका महिलेचा पती मेहुणीसह फरार झाला, तर दुसरीकडे तिची आईही सासऱ्यासोबत पळून गेल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात चर्चांना उधाण आले आहे. फरीदपूर येथील रहिवासी असणाऱ्या पीडित सुधा कुमारी यांनी घडला प्रकार सांगितला आहे. सुधा कुमारी हिचा 21 जून 2021 रोजी भगवानपूर येथील छोटू कुमारसोबत विवाह […]
अधिक वाचा...Video: पुणे पब ड्रग्ज पार्टी प्रकरणी पोलिसांची मोठी कारवाई…
पुणे : पुणे शहरातील एफसी रोडवर असणाऱ्या एका पबमध्ये काही युवक अंमली पदार्थांचे सेवन करत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणानंतर पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी तातडीने कारवाई करत पब सील करण्याचे आदेश दिले. या प्रकरणी सहा जणांना अटक करण्यात आली असून, दोन पोलिस कर्मचाऱ्यांवरही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. […]
अधिक वाचा...Video: पोलिसकाका क्राईम ताज्या घडामोडी….
नमस्कार, पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी… पुणे शहरात ड्रग्ज प्रकरणात मोठी कारवाई, हॉटेल मालकासह 5 जण ताब्यात पुणे: पुणे शहरातील एफसी रोडवर असलेल्या लिक्विड लीजर लाऊंजवर ड्रग्ज प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली असून, पाच जणांना ताब्यात घेतले आहे. शिवाय, दोन पोलिसांचेही निलंबन करण्यात आले आहे. आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने […]
अधिक वाचा...रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) रेश्मा पाटील या गेल्या १६ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील जन्म. गावातील वस्तीवर घर. शाळेत जाण्यासाठी साडेतीन किलोमीटर चालत जावे लागे. दररोज किमान सात किलोमीटर चालणे. शाळेत असताना खेळाची आवड निर्माण झाली आणि धावण्याच्या शर्यतीत प्रथम क्रमांक मिळू लागला. राष्ट्रीय आणि राज्य पातळी सुवर्णपदकासह विविध पुरस्कार मिळविले आहेत. खेळामुळे […]
अधिक वाचा...
