धक्कादायक! नवविवाहीत पत्नी शरीर संबंध ठेऊ देत नाही म्हणून…

पुणेः नवविवाहीत पत्नी शरीर संबंध ठेऊ देत नसल्याच्या कारणावरून व तिचे विवाह बाह्य संबंध असल्याच्या संशयातून संतापलेल्या पतीने पत्नीला देहू येथील घाटावर फिरायला नेत तिची ओढणीच्या साह्याने गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी आरोपी पतीला अटक करण्यात आली असून न्यायालयाने त्याला सात दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे.

दोन महिन्यांपूर्वीच दोघांचा विवाह झाला होता. देहूगाव येथील गाथा मंदिर मागील आनंद डोह घाट परिसरात गुरुवारी (ता. २०) संध्याकाळी ९ च्या सुमारास ही घटना घडली असून, या घटनेने खळबळ उडाली आहे. प्रतीक्षा जयदीप यादव (वय २१) असे खून झालेल्या नव विवाहितेचे नाव आहे. जयदीप अर्जुन यादव (वय २९, रा. देहूगाव, मूळ रा. चिखलगोळ, जि. सांगली) असे आरोपी पतीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील कुरुंदवाड येथील भीमराव कोरे यांची मुलगी प्रतीक्षा व जयदीप यादव यांचा दोन महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. प्रतीक्षा हिचे शिक्षण एमएसस्सीपर्यंत तर जयदीप याने अभियांत्रिकी शाखेतील पदवी घेतली आहे. जयदीप हा एका खासगी कंपनीत नोकरीला आहे. दोघे सात दिवसांपूर्वी देहूगाव येथे राहण्यासाठी आले होते. सुरुवातीला दोघांचेही चांगले चालले होते. मात्र, काही दिवसांनी प्रतीक्षा ही जयदीपला शारीरिक संबंध ठेवू देत नव्हती. यामुळे जयदीपला तिच्यावर संशय येत होता. तिचे विवाहबाह्य संबंध असल्याचा देखील संशय त्याला होता. याच संशयातून त्याने प्रतीक्षाला गुरुवारी सायंकाळी देहूगाव येथील आनंद डोह घाट परिसरात फिरायला नेले. या ठिकाणी त्याने तिला शरीर संबंध का ठेऊ देत नाही? या बाबत जाब विचारला. मात्र, दोघांत भांडण झाल्याने संतापलेल्या जयदीपने तिचा तिथेच गळा आवळून खून केला. या प्रकरणी पुरावा नको म्हणून त्याने त्याचा मोबाइल हा इंद्रायणी नदीत फेकून दिला होता.

दरम्यान, देहू येथील घाटावर महिलेचा मृतदेह सापडल्याने तातडीने पोलिस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी काही वेळातच आरोपी जयदीपला अटक केली. तसेच प्रतीक्षाचा मृतदेह हा पिंपरीतील वायसीएम रुग्णालयात शवविच्छेदन करून तिच्या नातेवाईकांच्या ताब्यात दिला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

हृदयद्रावक! एक तासापूर्वी माहेरी आलेल्या नवविवाहितेचा वीज पडून मृत्यू…

नवविवाहितेची आत्महत्यानंतर घरच पेटवलं, सासू-सासऱ्यांचा होरपळून मृत्यू…

नवविवाहितेने हाताच्या तळव्यावर कारण लिहून केली आत्महत्या…

नवविवाहितेच्या अपहरण प्रकरणाला लागले वेगळे वळण…

नवविवाहितेला नको त्या अवस्थेत सासूने पाहिले अन् बसला धक्का; युवक निघाला…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!