Video: पोलिसकाका क्राईम ताज्या घडामोडी….

नमस्कार,
पोलिसकाकाच्या बातमीपत्रामध्ये आपले स्वागत. जाणून घेऊयात ठळक घडामोडी…

पुणे शहरात ड्रग्ज प्रकरणात मोठी कारवाई, हॉटेल मालकासह 5 जण ताब्यात
पुणे: पुणे शहरातील एफसी रोडवर असलेल्या लिक्विड लीजर लाऊंजवर ड्रग्ज प्रकरणी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कारवाई केली असून, पाच जणांना ताब्यात घेतले आहे. शिवाय, दोन पोलिसांचेही निलंबन करण्यात आले आहे.

आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या पुतण्याने दोघांना चिरडले
पुणेः खेड तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांचा पुतण्या मयुर मोहिते याने आपल्या चारचाकी गाडीने दोघांना उडवलं. त्यापैकी एकाचा जागीच मृत्यू झाला असून एकावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुन्हा दाखल झाल्यानंतर काही तासांतच त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

अकोल्यात कूलरचा शॉक लागून दोन चिमुकल्या मूलींचा मृत्यू
अकोला: अकोल्यात कूलरचा शॉक लागून दोन चिमुकल्या मूलींचा मृत्यु झाला आहे. ईशानी प्रवीण ढोले आणि प्रियांशी सोपान मेतकर असे मरण पावलेल्या मुलींची नावे आहेत. त्या मामाकडे राहायला आल्या होत्या.

पुण्याजवळ झाडावर एसटी बस आदळली; 30 जखमी
पुणे : पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यात असलेल्या यवतजवळ एसटी बसचा भीषण अपघात झाला आहे. एसटी बस झाडावर आदळल्याने 30 प्रवासी जखमी झाले आहेत. जखमींमधील काहींची प्रकृती चिंताजनक आहे.

गडचिरोलीत नक्षली मोर्‍हक्या गिरीधरचे पत्नीसह आत्मसमर्पण
गडचिरोली : गडचिरोलीतील जहाल माओवादी आणि जिल्ह्यातील नक्षली चळवळीचा मोर्‍हक्या समजल्या जाणार्‍या गिरधरने पत्नीसह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण केले. त्याच्यावर 25 लाखांचे बक्षीस होते.

शेअर बाजारातून भरघोस नफा मिळवून देण्याचे आमिष
गोंदिया: शेअर बाजारात गुंतवणूक करुन भरघोस परतावा मिळवून देण्याचं आमिष दाखवून कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून किसन पांडे ( वय 21 वर्ष) आणि कन्हैयालाल पांडे (वय 24 वर्ष) या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

बीड जिल्ह्यात पिकअप व्हॅनला बांधून पळवलं ATM मशीन
बीड: बीडच्या धारूर येथे एसबीआय बँकेचे एटीएम मशीन अवघ्या 2 मिनिटात पिकअपला बांधून पळवले. संबंधित प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. यानंतर अवघ्या 4 तासांमध्ये 61 किलोमीटरच्या पाठलागानंतर या प्रकरणाचा छडा लावत 21 लाख 13 हजार 700 रुपयांची रोकडही परत आणली आहे.

UGC-NET पेपर लीकचा तपास करणाऱ्या CBI टीमवर हल्ला, 4 जणांना अटक
नवी दिल्ली : यूजीसी नेट पेपर लीकचा तपास करण्यासाठी पोहोचलेल्या सीबीआयच्या टीमवर बिहारच्या नवदामध्ये हल्ला करण्यात आला आहे. ग्रामस्थांच्या हल्ल्यातून कसेबसे वाचल्यानंतर सीबीआयचे अधिकारी रजौली पोलीस स्टेशनला पोहोचले. यानंतर पोलिसांनी लगेचच 4 जणांना अटक केली आहे.

भाजप नेत्याची गोळ्या झाडून हत्या
इंदौर : मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये भाजप नेत्याची जुन्या वादातून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. गोळ्या झाडल्यानंतर दोन हल्लेखोर घटनास्थळावरून फरार आले आहेत. भाजप नेत्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

माजी खासदार प्रज्वल रेवन्नाच्या भावाला अनैसर्गिक संबंधप्रकरणी अटक
बंगळुरू : जेडीएस नेता आणि माजी खासदार प्रज्वल रेवन्ना सेक्स स्कँडल प्रकरण चर्चेत असतानाच प्रज्वल रेवन्नाचा भाऊ सूरज रेवन्नाला अनैसर्गिक संबंधप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

policekaka-special-offer

पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’

पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) आबिद सय्यद : पोलिस दलासोबत जिव्हाळ्याचे नातं!
२८) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: http://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!