ब्रिटनमधून एमटेक पदवीप्राप्त तरुणाने शेजाऱ्याच्या खंडणीसाठी मुलाचे अपहरण करून केली निर्घृण हत्या…
बंगळूर: बंगळूर शहर जिल्ह्यात एका १३ वर्षीय मुलाच्या अपहरण आणि हत्येप्रकरणी ब्रिटनमधून परतलेल्या एका एमटेक पदवीधराला अटक करण्यात आली आहे. नुकताच एका कंपनीत रुजू झालेल्या आरोपीने, बुधवारी रात्री आपल्या पूर्वीच्या शेजाऱ्याच्या मुलाची खंडणीसाठी निर्घृणपणे हत्या केली. पोलिसांच्या माहितीनुसार, मुख्य आरोपी भास्कर रेड्डीने आपल्या कुटुंबाचे ३ कोटी रुपयांचे कर्ज फेडण्यासाठी, रिअल इस्टेट व्यावसायिक असलेल्या मुलाच्या वडिलांकडून […]
अधिक वाचा...केरळच्या नौदल अकादमीत बनावट ओळखपत्रावर काम करणाऱ्या बांगलादेशी व्यक्तीला अटक…
तिरुवनंतपुरम: केरळच्या अत्यंत संवेदनशील एझिमला नौदल अकादमीमध्ये काम करणाऱ्या एका बांगलादेशी नागरिकाला अटक करण्यात आली आहे. तो भारतीय नागरिक असल्याचे भासवून बनावट कागदपत्रांच्या आधारे तिथे काम करत होता. बिप्लब सोरेन (वय ३२) असे नाव धारण करणारी ही बांगलादेशी व्यक्ती, आपले बांगलादेशी नागरिकत्व लपवून नौदल अकादमीच्या लाँड्री विभागात कंत्राटी कामगार म्हणून काम करत होता. प्राथमिक माहितीनुसार, […]
अधिक वाचा...मातोश्रीच्या गेटबाहेर हायव्होल्टेज ड्रामा, दिशा सालियनचे वडील आदित्य ठाकरेंना नोटीस द्यायला पोचले…
मुंबईः दिशा सालियान मृत्यू प्रकरणात मुंबईतील ठाकरे कुटुंबाचे निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’ बंगल्याच्या गेटबाहेर शनिवारी दुपारी जोरदार हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळाला. दिशा सालियनचे वडील सतीश सालियान हे स्वतः वकिलांच्या टीमसह आमदार आदित्य ठाकरे यांना कायदेशीर नोटीस देण्यासाठी मातोश्रीवर दाखल झाले. आदित्य ठाकरे यांनी दिशा सालियन प्रकरणी सोशल मीडियावर केलेल्या पोस्टनंतर सतीश सालियान यांनी आदित्य ठाकरे आणि […]
अधिक वाचा...केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणी सिया गोयलचा होणार ‘गेम ओव्हर’…
पुणे: केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात आता नवनवीन खुलासे होत असून, सिया गोयलच्या अडचणी वाढताना दिसत आहे. सिया अन् तिचा प्रियकर चेतन अटकेत आहेत. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी केतनच्या हत्याच्या 93 दिवसानंतर मोठा निर्णय घेतला आहे. केतन अग्रवाल मृत्यू प्रकरणात पुणे पोलिस आज (शनिवार) न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करणार आहेत. या प्रकरणात तपास पूर्ण झाल्यानंतर आता पुणे […]
अधिक वाचा...पुणे! हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा पर्दाफाश; फोनवरून बुकिंग अन् लॉजवर मुली…
पुणे : पुणे शहरातील खराडी परिसरात फोनवरून ऑर्डर घेऊन हॉटेल अन् लॉजवर मुली पुरवणाऱ्या एका हायप्रोफाईल सेक्स रॅकेटचा येरवडा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. पोलिसांनी थेट ‘बनावट ग्राहक’ पाठवून सापळा रचला आणि या देहव्यापाराचा भांडाफोड केला. या धडक कारवाईत दोन दलालांना बेड्या ठोकण्यात आल्या असून, दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा […]
अधिक वाचा...पुण्याच्या बनावट कॉल सेंटरवर अंमलबजावणी संचालनालयाची कारवाई…
पुणे: अमेरिकन नागरिकांची कथित फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरच्या नेटवर्कविरोधात, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पुणे, पतियाळा आणि चंडीगड येथे कारवाई केली. ईडीच्या हैदराबाद विभागीय कार्यालयाने केलेल्या या कारवाईत तीन कार्यरत बनावट कॉल सेंटर आढळून आली. त्याठिकाणी सुमारे २२० जण कार्यरत असल्याचे तपासात समोर आले. ईडीच्या माहितीनुसार, या कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना विविध खोट्या कारणांवरून संपर्क साधून […]
अधिक वाचा...एकोणिसाव्या मजल्यावरून पडल्याने गुरुग्राममध्ये एक मजूर मृत्यूमुखी; तर दुसरा गंभीर जखमी…
गुरुग्राम: बाजघेरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सेक्टर-११३ मध्ये बांधकाम सुरू असलेल्या स्मार्ट वर्ल्ड बिल्डिंगच्या १९ व्या मजल्यावरून पडून एका कामगाराचा मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे. ही घटना शुक्रवारी संध्याकाळी घडली. अपघातानंतर संतप्त कामगारांनी बिल्डर आणि कंत्राटदारावर निष्काळजीपणाचा आरोप करत गोंधळ घातला. पोलीस घटनास्थळी दाखल झाले, त्यांनी हस्तक्षेप करून मृतदेह ताब्यात घेतला, शवविच्छेदनासाठी पाठवला […]
अधिक वाचा...ग्रेटर नोएडामध्ये जीएनआयओटी महाविद्यालयाजवळ वेगवान गाडीखाली चिरडले गेले पाच विद्यार्थी…
ग्रेटर नोएडा: नॉलेज पार्क कोतवाली परिसरातील जीएनआयओटी महाविद्यालयाजवळ, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पाच विद्यार्थ्यांना भरधाव गाडीने धडक दिली. घटनेचा व्हीडिओ इंटरनेटवर वेगाने पसरतो आहे. व्हीडिओच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी चालकाला अटक केली आणि गाडी जप्त केली आहे. व्हीडिओमध्ये अनेक विद्यार्थी आणि इतर लोक रस्त्याच्या कडेला उभे असलेले दिसत आहेत. त्यानंतर एक भरधाव वेगाने […]
अधिक वाचा...पुराव्याअभावी कठोर कायदाही कुचकामी; पॉक्सो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल
नवी दिल्ली: लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (पॉक्सो) कायद्यांतर्गत एका खटल्यात निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, आरोपी दोषी असल्याची पक्की धारणा असण्याचा अर्थ असा नाही की, सत्र न्यायालयाने फिर्यादी पक्षाची बाजू अपरिहार्य सत्य म्हणून स्वीकारली पाहिजे. सबळ पुराव्याअभावी कठोर कायदाही कुचकामी ठरू शकतो, असे न्यायालयाने आपल्या निकालात म्हटले आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, […]
अधिक वाचा...मुसळधार पावसामुळे मध्य प्रदेशातील नाल्याला आलेल्या पुरात ८ भाविक मृत्यूमुखी…
भोपाळ: मध्य प्रदेशातील आगर-माळवा जिल्ह्यातील नळखेडा येथील प्रसिद्ध माता बगलामुखी मंदिर परिसरात काल रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे, मंदिराजवळून वाहणाऱ्या नाल्याला आलेल्या पुरात, प्रवाशांनी भरलेली एक गाडी वाहून गेली. या गाडीतील तीन मुले, तीन पुरुष आणि दोन महिलांसह आठ जण मृत्यूमुखी पडल्याचे वृत्त आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी नाल्यातून […]
अधिक वाचा...
