पुण्याच्या बनावट कॉल सेंटरवर अंमलबजावणी संचालनालयाची कारवाई…

पुणे: अमेरिकन नागरिकांची कथित फसवणूक करणाऱ्या बनावट कॉल सेंटरच्या नेटवर्कविरोधात, अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) पुणे, पतियाळा आणि चंडीगड येथे कारवाई केली. ईडीच्या हैदराबाद विभागीय कार्यालयाने केलेल्या या कारवाईत तीन कार्यरत बनावट कॉल सेंटर आढळून आली. त्याठिकाणी सुमारे २२० जण कार्यरत असल्याचे तपासात समोर आले.

ईडीच्या माहितीनुसार, या कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांना विविध खोट्या कारणांवरून संपर्क साधून त्यांच्याकडून पैसे उकळल्याचा आरोप आहे. कारवाईदरम्यान ६६ मोबाईल फोन, १३ लॅपटॉप, हार्ड डिस्क, इतर डिजिटल उपकरणे, रोकड आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली.

 

View this post on Instagram

 

A post shared by www.policekaka.com (@policekaka_news)

या उपकरणांमध्ये कथित फसवणुकीची कार्यपद्धती, ग्राहकांची माहिती आणि पैशांच्या व्यवहारांशी संबंधित डिजिटल पुरावे आढळल्याचे ईडीने सांगितले. चंडीगडमधील एका निवासस्थानीही तपास करण्यात आला. हे ठिकाण पतियाळातील कॉल सेंटरच्या कथित नियंत्रणासाठी वापरले जात असल्याचा ईडीचा दावा आहे.

पुणे! नवले पुलाजवळ रात्रीच्या अंधारात पुन्हा ब्रेक फेल झाल्याने थरार…

पुणे जिल्ह्यात युवकाचा केला अत्यंत क्रूरपणे खून; धक्कादायक कारण समोर…

पुणे! कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू; नामांकित बिल्डरचं नाव चर्चेत…

पुणे! मैत्रिणीशी बोलल्याच्या रागातून युवकाचं अपहरण; पोलिस अधिकाऱ्याचे 21 कॉल अन् थरारक पाठलाग…

पुणे! विद्यानंद बापट यांना मारहाण करणारा नेमका कोण? महत्त्वाची माहिती समोर…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!