एकनाथ शिंदे यांच्या एस्कॉर्टमधील पोलिस अधिकाऱ्याचे निधन…
ठाणे : राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या एस्कॉर्ट पथकातील पोलीस उपनिरीक्षक (psi) विजय सांगडे (वय ५७) यांचे कर्तव्यावर असतानाच निधन झाले. आज (सोमवार) सकाळी ते ड्युटीवर आल्यानंतर ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात त्यांना छातीत दुखू लागल्यानंतर चक्कर आली. त्यांनतर त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. विजय सांगडे यांच्या अकाली निधनाने […]
अधिक वाचा...साहिल वाकोडेच्या आत्महत्येनंतर आयआयटी मुंबईच्या प्रा. सूर्यनारायण दुला यांचा राजीनामा
मुंबई: द्वितीय वर्षाचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्येनंतर आयआयटी मुंबईमध्ये खळबळ उडाली आहे. प्राध्यापक सूर्यनारायण दुला यांच्या विरोधात अनुसूचित जाती आणि जमाती कायद्यांतर्गत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणामुळे व्यथित झालेल्या प्राध्यापकांनी आयआयटी मुंबईतून राजीनामा दिला असून, ते एका मोठ्या वादाच्या केंद्रस्थानी आले आहेत. या वादामध्ये विद्यार्थ्यांची आंदोलने, वाकोडेच्या पालकांचे आरोप आणि परीक्षेसंबंधित ही […]
अधिक वाचा...टीईटी पेपरफुटी प्रकरणी दोन फरार आरोपींना पोलिसांकडून अटक…
भिवंडीः टीईटी पेपरफुटी प्रकरणात फरार असलेल्या दोन आरोपींना अटक करण्यात पोलीस यंत्रणेला यश आले आहे. या आरोपींना रविवारी भिवंडी न्यायालयात हजर केले असता त्यांना २३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या आरोपींच्या अटकेनंतर टीईटी प्रकरणात आतापर्यंत अटक केलेल्या एकूण आरोपींची संख्या १८ वर पोहोचली आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले आहे. […]
अधिक वाचा...पुणे! आयटी इंजिनीअरने पत्नीला संपवलं अन् मारली गॅलरीतून उडी…
पुणे : कौटुंबिक कलहातून पतीने आपल्या पत्नीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवड शहरातून समोर आला आहे. आयटी इंजिनीअरने कौटुंबिक वादातून पत्नीवर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून केला. नंतर स्वतःवर देखील वार करत दुसऱ्या मजल्यावरून उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. देहुगावातील ओमकार सोसायटी परिसरात 20 सप्टेंबर रोजी सकाळी पावणे सहाच्या सुमारास शुभांगी आकाश बारस्कर […]
अधिक वाचा...भोंदू बाबाच्या लॅपटॉपमध्ये महिला अन् विद्यार्थिनींचे अश्लील व्हिडिओ; गुंगीचे औषध आणि छुपे कॅमेरे…
चेन्नईः तामिळनाडूतील सेलम पोलिसांनी महिला आणि अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी एका भोंदूबाबाला अटक केली. आरोपीकडून एक लॅपटॉप जप्त करण्यात आला असून, त्यात महिला आणिविद्यार्थिनींचे 50 हून अधिक व्हिडिओ मिळाले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी विजयराजा (वय 50) हा वाझपडीजवळ जादूटोणा केंद्र चालवत होता. तो विधी आणि जादूटोणा करण्याच्या नावाखाली लपवलेल्या कॅमेऱ्यांचा […]
अधिक वाचा...नागपूरमध्ये वादळी पाऊस; वीज पडून दोन चुलत भावांचा मृत्यू…
नागपूर: नागपूर जिल्ह्यात अंगावर वीज पडल्याने शेतकरी असलेल्या दोन चुलत भावांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी रविवारी येथे दिली. ही घटना शनिवारी रात्री मोहपा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील तिष्टी खुर्द गावात घडली. दोघेही शेतकरी असलेले पीडित जनावरांना पाजण्यासाठी शेतात गेले होते. ते घरी परत न आल्याने त्यांच्या कुटुंबीयांनी शोध सुरू केला असता, ते गावातील एका मंदिरात […]
अधिक वाचा...दिल्लीतील सरिता विहारमध्ये भरधाव डंपरच्या भीषण अपघातात एचआर मॅनेजर आणि इतर तिघांचा मृत्यू…
नवी दिल्ली: दिल्लीतील सरिता विहार पोलीस ठाण्याच्या हद्दीत, भरधाव वेगाने येणाऱ्या एका डंपरने उभ्या असलेल्या क्रेन आणि एका रिक्षाला धडक दिली. या अपघातात तीन जणांचा मृत्यू झाला आणि इतर तीन जण जखमी झाले. या अपघातामुळे घटनास्थळी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. माहिती मिळताच पोलीस तत्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बचाव व मदतकार्य सुरू केले. पोलिसांनी […]
अधिक वाचा...केतन अग्रवाल हत्या प्रकरणी ग्रामीण पोलिसांनी वडगाव मावळ न्यायालयात दोषारोपपत्र सादर…
पुणे: केतन अग्रवाल हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण करून पुणे ग्रामीण पोलिसांनी वडगाव मावळ न्यायालयात ५०५३ पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. सिया प्रवीण गोयल, चेतन बाबुलाल चौधरी आणि रितेश संजय हंगे यांच्याविरोधात हे दोषारोपपत्र दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणात पोलिसांनी प्रत्यक्ष साक्षीदारांसह डिजिटल आणि तांत्रिक पुरावेही मोठ्या प्रमाणावर संकलित केले आहेत. दोषारोपपत्रात संशयितांच्या मोबाईल फोनमधील […]
अधिक वाचा...समृद्धी महामार्ग ते पुण्यापर्यंत ६ तास पाठलाग करून १.१३ कोटींचा गुटखा एफडीएकडून जप्त…
मुंबई: समृद्धी महामार्गापासून पुण्यापर्यंत चाललेल्या सहा तासांच्या थरारक पाठलागानंतर अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) शुक्रवारी चाकण-तळेगाव चौकात एका ट्रक अडवून १.१३ कोटी रुपयांचा प्रतिबंधित गुटखा आणि पानमसाला जप्त केला. १८ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, एफडीएच्या पथकांनी मध्य प्रदेशातून अवैध गुटख्याची वाहतूक करणाऱ्या एका टाटा ट्रकचा पाठलाग सुरू केला. हा […]
अधिक वाचा...पुणे! व्यावसायिकाचा प्रेयसीसोबत परदेशात जायचा बेत अन् घडलं भलतंच…
पुणे : पुण्यातील व्यावसायिक व्यवसायाच्या निमित्ताने मलेशियाला (कुआला लंपूर) बिझनेस ट्रिपसाठी जात असल्याचे सांगून तो घरून निघाला. मात्र, या व्यापाऱ्याचा डाव मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर एका पासपोर्टमुळे पुरता उधळला गेला. आपले बिंग फुटू नये म्हणून व्यापाऱ्याने बनावट इमिग्रेशन आणि अपहरणाची खोटी कहाणी रचली. मात्र, पोलिसांच्या तपासात या संपूर्ण हाय-व्होल्टेज ड्रामाचा पर्दाफाश झाला आहे. पुण्यात लाँड्रीचा मोठा […]
अधिक वाचा...
