वृद्धाला अनैतिक संबंध पडले महागात; लुट-लुट लुटलं अन् शेवटी…

मुंबई: कांदिवली पश्चिम परिसरातील एका ६० वर्षीय वृद्ध व्यक्तिला अनैतिक संबंध ठेवणे महागात पडले आहे. आरोपी महिलेने आपली मुलगी आणि मुलीच्या मैत्रिणीच्या मदतीने वृद्धाला लुट-लुट लुटले आहे. आरोपींनी पीडित वृद्धाच्या अनैतिक संबंधाची माहिती पत्नीला सांगेन, अशी धमकी देऊन त्याच्याकडून तब्बल ३७ लाख रुपये आणि इतर किमती ऐवज लुटला आहे.

आरोपी महिलांनी पीडित वृद्धाकडे दीड कोटी रुपयांची मागणी केली होती. आरोपी महिलांच्या सततच्या त्रासाला कंटाळून वृद्धाने पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. याप्रकरणी पोलिसांनी गुन्ह्यात साथ देणाऱ्या मैत्रीणीला अटक केली आहे. तर मुख्य आरोपी महिला आणि तिची मुलगी फरार आहेत. पोलिस दोघींचा शोध घेत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ६० वर्षीय पीडित व्यक्ती मुंबईतल्या कांदिवली पश्चिम परिसरात आपल्या कुटुंबासोबत राहात आहे. एका विवाहित महिलेसोबत त्याचे अनैतिक संबंध सुरू होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून आरोपी महिला तिची मुलगी आणि तिची २१ वर्षांची मैत्रीण अशा तिघींनी मिळून वृद्धाला धमकवण्यास सुरुवात केली. अनैतिक संबंधाची माहिती पत्नीला देऊ, अशी धमकी देत वृद्धाला ब्लॅकमेल केले. घाबरलेल्या तक्रारदारेने आरोपी महिलांच्या सगळ्या मागण्या पूर्ण केल्या. त्यांना तब्बल ३७ लाख आणि इतर मौल्यवान वस्तू दिल्या. तरीही आरोपी महिला तक्रारदाराला त्रास देत राहिल्या. १२ डिसेंबरला आरोपी महिलांनी तक्रारदाराकडे दीड कोटींची मागणी केली. यामुळे तक्रारदाराने पोलिस ठाण्यात धाव घेतली. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपी महिला, तिची मुलगी आणि मैत्रीण अशा तिघींविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी आरोपी मैत्रीणीला अटक केली आहे. पण या घटनेतील मुख्य आरोपी आणि तिची मुलगी फरार आहेत. पोलिस दोघींचा शोध घेत आहेत.

लष्करातून निवृत्त झालेल्या वृद्धाला अश्लिल व्हिडिओ कॉल अन्…

महिलांना अश्लील ध्वनीचित्रफीत पाठवणारा विकृत ताब्यात…

लॉजवर अल्पवयीन मुलीसोबत शरीरसंबंध सुरू असताना झाला मृत्यू…

पोलिस अधिकाऱ्याला मैत्रिणीसोबत असताना पत्नीने रंगेहात पकडले अन्…

लखोबा लोखंडे! दोघींशी लग्न, तिसरीसोबत बोलणी, चौथ्यांदा बोहल्यावर चढणार, तेवढ्यात…

Video: टॅक्सीत विद्यार्थिनीसमोर हस्तमैथून करणाऱ्याला पोलिसांनी उत्तर प्रदेशातून ठोकल्या बेड्या…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!