बदलापूर अत्याचार प्रकरणात कारवाईत दिरंगाई करणाऱ्या पोलिसांना उच्च न्यायालयाचा दणका…

मुंबई: बदलापूर येथील एका नामांकित शाळेमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणामध्ये आता पोलिसांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. बदलापूर अत्याचार प्रकरणाचा तपास पूर्ण झाला आहे, या प्रकरणात निलंबनाच्या कारवाई म्हणून या महिला अधिकाऱ्याची दोन वर्षांची वेतनवाढही रोखण्यात आली आहे.

एसआयटीच्या अहवालातून चकमकीत ठार झालेल्या अक्षय शिंदे आणि या प्रकरणावर पडदा टाकण्याचे काम शाळेचे विश्वस्त करत असल्याचे अहवालात म्हटले आहे. आरोपी अक्षय शिंदे यांचे कुटुंबीय आपल्या संपर्कात नसल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी न्यायालयाला केला आहे. शिंदे कुटुंबीयांना पुढील सुनावणीला दूरचित्रप्रणालीद्वारे न्यायालयात उपस्थित करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणाचं गांभीर्य ओळखून तातडीने गुन्हा दाखल न केल्यामुळे आणि तपासात टाळाटाळ केल्याप्रकरणी बदलापूर पोलीस ठाण्यातील पोलीस अधिकाऱ्यांची विभागीय चौकशी सुरू करण्यात आली होती. बदलापूर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ महिला पोलीस निरीक्षकांना विभागीय चौकशीनंतर निलंबित करण्यात आले आहे. त्याचबरोबर त्यांचे दोन वर्षांची वेतनवाढही थांबवण्यात आली आहे. त्याचबरोबर या प्रकरणी मृत आरोपी अक्षय शिंदे आणि या प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्या शाळेचे विश्वस्त करत असल्याचे अहवालात म्हटले आहे.

दरम्यान, बदलापूरमध्ये काही महिन्यांपुर्वी एका शाळेत दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला होता. या घटनेनंतर संपूर्ण बदलापूरमधील नागरिक आक्रमक झाले होते. ही घटना समोर आल्यानंतर नागरिकांनी संबंधित शाळेच्या बाहेर येऊन आंदोलन केले होते. काही आंदोलकांनी बदलापूर रेल्वे स्थानकावर जाऊन रेल्वे रोखून धरल्या होत्या. या प्रकरणातील आरोपीला तत्काळ फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी जनतेने केली होती. शाळेतील एका सफाई कर्मचाऱ्याने हे घृणास्पद कृत्य केले होते. त्याच्यावर लहान मुलांना स्वच्छतागृहात घेऊन जाण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.

अक्षय शिंदे याच्या एन्काउंटरनंतर पोलिसांना करावी लागतेय मृतदेहाची राखण…

खळबळनक पोस्ट! अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर स्वसंरक्षणार्थ की जाणूनबुजून केलेला कट…

अक्षय शिंदे याच्या मृतदेहाचे दहन नाही तर दफन केले जाणार; कारण…

अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरप्रकरणी न्यायमुर्तींनी विचारले पोलिसांना अनेक प्रश्न…

बदलापूर प्रकरण! वकिलाचा दावा अन् संशयास्पद पोलिस चकमकीवर प्रश्न…

बदलापूर अत्याचार! आरोपी अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाला नवं वळण…

अक्षय शिंदे याचा एन्काऊंटर झालेल्या पोलिसांच्या गाडीत काय सापडलं पाहा…

अक्षय शिंदे याचा एन्काउंटर करणारे स्पेशालिस्ट संजय शिंदे आहेत कोण?

अक्षय शिंदे याच्या एन्काऊंटरची A टू Z स्टोरी…

बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याने स्वत:वर झाडली गोळी!

बदलापूर प्रकरण! अक्षय शिंदे याची दुसरी पत्नीही आली समोर: म्हणाली लिंगपिसाट…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!